नवी मुंबईच्या क्राईम ब्रँचने केला आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश; 362 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: महाराष्ट्रात ड्रग्जच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. नवी मुंबईतील गुन्हे शाखेच्या पथकाने या मोठ्या रॅकेटचा भांडाफोड केला आहे. नवी मुंबई गुन्हे शाखेने कोट्यवधींचे हेरॉईन जप्त केले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात (International Drug Racket) या हेरॉईनची किंमत 362.5 कोटी इतकी आहे. कालच नवी मुंबई पोलिसांना अमली पदार्थांची पकडण्यात यश आले होते. नवी मुंबईतील (Navi Mumbai Crime Branch) पनवेल परिसरातील आजिवली येथील नवकार लॉजिस्टिकच्या कंटेनरमधून हे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

सलग दुसऱ्या दिवशी नवी मुंबईच्या गुन्हे शाखेच्या पथकाला अमली पदार्थ पकडण्यात मोठे यश आले आहे. जप्त करण्यात आलेली हेरॉईनची खेप हा आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेट एक भाग असल्याचे गुन्हे शाखेच्या पथकाने उघड केले आहे. या संपूर्ण रॅकेटचे नेटवर्क देशातील अनेक भागातील आहेच शिवाय हे रॅकेट जगातील इतर देशांमध्येही पसरलेले आहे. हे रॅकेट दिर-भाऊजय मिळून अमली पदार्थांची विक्री करायचे हे चौकशीत उघडकीस आले आहे.

यापूर्वी, आणखी एका प्रकरणात, मुंबईतील चित्रपट उद्योगाशी संबंधित आणि दिल्लीतील हायप्रोफाईल लोकांना अमली पदार्थांचा पुरवठा करण्यासाठी नेपाळमधून ड्रग्ज पुरवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला होता. २६ जून रोजी मुंबईतील दिर-भाऊजयीला गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला होता. त्यांच्याकडून पाच कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर आता हे रॅकेट नेपाळ आणि नंतर मध्य प्रदेशातील भोपाळमधून दिल्ली, महाराष्ट्र आणि यूपी या मोठ्या शहरांमध्ये पसरलेले आढळले आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT