Nawab Malik: ‘ये क्या किया तुने समीर वानखेडे?’, नवाब मलिकांनी मध्यरात्रीच शेअर केला नवा फोटो
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र सरकारचे मंत्री नवाब मलिक यांनी अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोचे (NCB) मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात गेल्या काही महिन्यांपासून आघाडी उघडली आहे. समीर वानखेडे हे मूळ मुस्लिम असून त्यांनी धर्म परिवर्तन करुन नोकरी मिळवला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच दरम्यान, नवाब मलिक यांनी मध्यरात्री समीर वानखेडे यांचा […]
ADVERTISEMENT

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र सरकारचे मंत्री नवाब मलिक यांनी अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोचे (NCB) मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात गेल्या काही महिन्यांपासून आघाडी उघडली आहे. समीर वानखेडे हे मूळ मुस्लिम असून त्यांनी धर्म परिवर्तन करुन नोकरी मिळवला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच दरम्यान, नवाब मलिक यांनी मध्यरात्री समीर वानखेडे यांचा आणखी एक फोटो आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. ज्यावरुन त्यांनी पुन्हा एकदा समीर वानखेडेंवर हल्लाबोल केला आहे.
महाराष्ट्र सरकारचे मंत्री नवाब मलिक यांनी मध्यरात्री आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरुन एक फोटो ट्विट केला आहे. नवाब मलिक यांनी फोटो ट्विट करताना कॅप्शनमध्ये असं म्हटलं आहे की, ‘कबूल है, कबूल है, कबूल है… याच ट्विटमध्ये त्यांनी पुढे असं लिहिलं आहे की, ‘समीर दाऊद वानखेडे तुम्ही हे काय केलं?’
नवाब मलिक यांनी ट्विट केलेल्या या फोटोमध्ये टोपी घातलेला एक व्यक्ती (नवाब मलिक यांचा मते ही व्यक्ती समीर वानखेडे आहे.) एका कागदावर सही करताना दिसत आहे. हा ‘निकाहनामा’ असल्याचे सांगितले जात आहे.
कबूल है, कबूल है, कबूल है…
यह क्या किया तुने Sameer Dawood Wankhede ? pic.twitter.com/VaVMZbrNo0— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 21, 2021
मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या मानहानीच्या याचिकेवर आज (22 नोव्हेंबर) सुनावणी होणार आहे. याच दिवशी नवाब मलिक यांनी निकाहनाम्यावर सही करतानाचा फोटो शेअर केला आहे.