अभिनेत्री अनन्या पांडेचा ड्रग्ज प्रकरणाशी काय संबंध?; एनसीबीने का टाकली घरावर धाड?
अभिनेता शाहरुख खानने आर्यन खानची तुरुंगात भेट घेतल्यानंतर बापलेकांमध्ये काय संवाद झाला, याबद्दलची चर्चा सुरू असतानाच अचानक एनसीबीने अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरावर धाड टाकल्याची माहिती समोर आली. एनसीबीचं एक पथक शाहरुख खानच्या मन्नत बंगल्या गेलं, तर दुसऱ्या पथकाने अनन्या पांडेच्या घरावर धाड टाकली. ही धाड टाकण्यामागचं कारण आता समोर आलं आहे. ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अभिनेत्री […]
ADVERTISEMENT

अभिनेता शाहरुख खानने आर्यन खानची तुरुंगात भेट घेतल्यानंतर बापलेकांमध्ये काय संवाद झाला, याबद्दलची चर्चा सुरू असतानाच अचानक एनसीबीने अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरावर धाड टाकल्याची माहिती समोर आली. एनसीबीचं एक पथक शाहरुख खानच्या मन्नत बंगल्या गेलं, तर दुसऱ्या पथकाने अनन्या पांडेच्या घरावर धाड टाकली. ही धाड टाकण्यामागचं कारण आता समोर आलं आहे.
ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अभिनेत्री अनन्या पांडेला समन्स बजावलं आहे. अनन्या पांडेला दुपारी दोन वाजता एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. त्यामुळे तिची नेमकी काय चौकशी होणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.
अनन्याच्या घरी काय झालं?
एनसीबीचं पथक गुरुवारी (२१ ऑक्टोबर) दुपारी एक वाजेच्या सुमारास अभिनेत्री अनन्या पांडे हिच्या मुंबईतील खार वेस्टला असलेल्या घरी धडकलं. यावेळी एनसीबीच्या पथकाने कारवाई करत अनन्या पांडेचा फोन ताब्यात घेतला. त्यानंतर तिला चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात हजर होण्यासंदर्भात समन्स बजावलं.