राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे ICU मधे होणार दाखल, वकिलांची न्यायालयात माहिती

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे हे मुंबईतील रूग्णालयात दाखल होणार आहेत. त्यांच्यावर एक महत्त्वाची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे त्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात येणार आहे अशी माहिती त्यांच्या वकिलांनी दिली.

पुण्यातील भोसरी या परिसरात असलेल्या जमीन घोटाळा प्रकरणात एकनाथ खडसे मुंबईतील सेशन्स अनुपस्थित होते. ते अनुपस्थित का होते? याबाबत त्यांच्या वकिलांनी माहिती दिली आहे. एकनाथ खडसे यांच्यावर एक शस्त्रक्रिया होणार आहे. त्यासाठी त्यांना मुंबईतल्या बॉम्बे रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे असं वकिलांनी न्यायालयाला सांगितलं.

दरम्यान एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनी याचा प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून अर्ज केला आहे. या प्रकरणी ईडीकडून चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. त्यात एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांची नावं आरोपी म्हणून लिहिण्यात आली आहेत. हे प्रकरण 2016 मधलं आहे, याच प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी अटकेत आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

एकनाथ खडसे यांना ED ने चौकशीसाठी का बोलावलं? काय आहे कारण?

पुण्यातील भोसरी भूखंड प्रकरण नेमकं आहे तरी काय?

ADVERTISEMENT

2016 मध्ये एकनाथ खडसे हे राज्याचे महसूल मंत्री होते. त्यावेळी त्यांच्यावर पुण्यातील भोसरी येथे भूखंड खरेदीत गैरव्यवहार केल्याचा आरोप केला गेला. एकनाथ खडसे यांनी भोसरी येथील सर्व्हे क्रमांक 52/2 अ/ 2 मधील तीन एकरचा भूखंड त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्या नावे हा खरेदी केला.

ADVERTISEMENT

या भूखंडाचा व्यवहार 3 कोटी 75 लाख रूपयांना अकानी नावाच्या व्यक्तीकडून खरेदी केला. पण या भूखंडाचा सातबारा MIDC च्या नावावर होता. त्यामुळे खडसे यांनी पदाचा गैरवापर करून भूखंड खरेदी केल्याचा आरोप झाला. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक हेमंत गावडे यांनी यासंदर्भात तक्रार केली होती.

एप्रिल 2017 मध्ये ACB ने म्हणजेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे, गिरीश चौधरी आणि अकानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. चौकशीही सुरू केली. मात्र 2018 मध्ये त्यांना क्लिन चिट देण्यात आली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT