अमोल कोल्हे राष्ट्रवादीपासून दूर जात आहेत? स्टार प्रचारकांच्या यादीतून नाव का वगळलं?
राहुल गायकवाड : पुणे : गुजरात विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीने ताकदीने उतरण्याची तयारी केली आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीकडून ३१ स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. पण या यादीमधून २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक राहिलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांना मात्र वगळण्यात आलं आहे. त्यामुळे नव्या चर्चांना उधाण […]
ADVERTISEMENT

राहुल गायकवाड :
पुणे : गुजरात विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीने ताकदीने उतरण्याची तयारी केली आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीकडून ३१ स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. पण या यादीमधून २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक राहिलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांना मात्र वगळण्यात आलं आहे. त्यामुळे नव्या चर्चांना उधाण आलं आहे.
या यादीत शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार, जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्वच मोठ्या नेत्यांची नावं या यादीत टाकण्यात आली आहेत. पण अमोल कोल्हेंना या यादीतून का वगळण्यात आलंय? याचे कुठले राजकीय अर्थ होतात हे आपण समजावून घेऊ.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारल्याने अभिनेते असलेले डॉ. अमोल कोल्हे घराघरात पोहचले. राजकारणात त्यांची सुरुवात शिवसेनेतून झाली असली तरी पुढे त्यांनी थेट राष्ट्रवादीत प्रवेश करत शिरुर मतदार संघाची लोकसभेची निवडणूक लढवली. यात त्यांनी शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला.