शरद पवारांसाठी 400 किमी चालत आला, पण अधिकाऱ्यांनी भेटच नाकारली : बारामतीत काय घडलं?
बारामती : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाडव्यादिवशी परंपरेप्रमाणे यंदा देखील माळेगावमधील ‘गोविंद बाग’ या निवासस्थानी कार्यकर्त्यांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी शरद पवार आणि कुटुंबियांना शुभेच्छा देण्यासाठी हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमाला शरद पवार यांच्यासह विरोधीपक्ष नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, पार्थ पवार यांनी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत, […]
ADVERTISEMENT
बारामती : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाडव्यादिवशी परंपरेप्रमाणे यंदा देखील माळेगावमधील ‘गोविंद बाग’ या निवासस्थानी कार्यकर्त्यांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी शरद पवार आणि कुटुंबियांना शुभेच्छा देण्यासाठी हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती.
ADVERTISEMENT
या कार्यक्रमाला शरद पवार यांच्यासह विरोधीपक्ष नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, पार्थ पवार यांनी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत, येणारं वर्ष सुख-समृद्धीचं जावो अशा सदिच्छा दिल्या.
आजच्या कार्यक्रमात हजारो कार्यकर्त्यांनी पवार कुटुंबियांची भेट घेतली आणि शुभेच्छा दिल्या असल्या तरीही बीडहून तब्बल ४०० किलोमिटर पायी आलेल्या एका कार्यकर्त्याला अधिकाऱ्यांनी भेट नाकारली. त्यामुळे त्या कार्यकर्त्याची घोर निराशा झाली. पण या कार्यकर्त्यांने आता शरद पवारांची भेट घेत नाही तोपर्यंत परत जाणार नाही असा निर्धार केला आहे.
हे वाचलं का?
नेमकं काय झालं?
राज्यभरातील हजारो कार्यकर्ते आज शरद पवार यांना भेटून गेले, मात्र 400 किमी पायी प्रवास करून आलेल्या कार्यकर्त्याला मात्र त्यांची भेट घेता आली नाही. राजेंद्र भवर असं या कार्यकर्त्याचं नाव आहे. बीड जिल्ह्यातल्या पाटोदा तालुक्यातून पायी प्रवास करून हा कार्यकर्ता केवळ शरद पवार यांना भेटण्यासाठी बारामती दाखल झाला.
पण एवढी पायपीट करत आल्यानंतर देखील भवर यांना शरद पवार यांची भेट मिळाली नाही. भेटीची वेळ संपल्याचे कारण सांगत भवर यांना अधिकाऱ्यांनी गेटमधून आत सोडलं नाही. त्यामुळे भंवर भावनाविवश झाले आहेत. पण आता कोणत्याही परिस्थितीत साहेबांची भेट घेतल्याशिवाय परत जाणार नाही असा निर्धार त्यांनी केला. भवर यांनी शरद पवार यांच्यावरील प्रेमापोटी आपल्या छातीवर त्यांचा फोटो गोंदून घेतला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT