खाद्यपदार्थांच्या पार्सलसाठी वर्तमानपत्राचा कागद विसरा, अन्न आणि औषध प्रशासनाचा नवा आदेश

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

दुकानांमध्ये, फूड स्टॉलवर, रस्त्यांवरच्या गाड्यांवर खाद्यपदार्थ बांधून द्यायचा असेल तर वर्तनमानपत्र म्हणजे पेपरचा कागद वापरला जातो. मात्र आता पोहे, वडापाव, भजी किंवा कोणताही खाद्यपदार्थ बांधून देण्यासाठी वर्तमानपत्राचा कागद वापरता येणार नाही. कारण वर्तमानपत्र प्रिंट करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शाईमध्ये वापरण्यात येणारे केमिकल घातक असते. अन्न आणि औषध प्रशासनाने यासंबंधीचे नवे आदेश काढले आहेत.

ADVERTISEMENT

डायआयब्युटाइल फटालेट आणि डायइन आयसोब्युटाईल या रसायनांचा वापर वर्तमानपत्रांच्या छपाईसाठी केला जातो. हे केमिकल आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असतं. तसंच गरम पदार्थ त्या कागदावर ठेवले तर हे केमिकल विरघळते आणि ते खाद्यपदार्थात मिसळण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे अतिरिक्त तेल शोषून घेण्यासाठी टीश्यू पेपर किंवा पेपर टॉवेलचा उपयोग करावा हे सुचवले जाते. मात्र तसे होत नाही. या केमिकलमुळे पचनक्रिया बिघडू शकते आणि पोटाचे विकार जडण्याचीही शक्यता असते.

हे वाचलं का?

या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन अन्न आणि औषध प्रशासनाने नवे आदेश काढले आहेत. ज्यामध्ये कोणतेही खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात बांधून देण्यास मज्जाव केला आहे.

ADVERTISEMENT

वर्तमानपत्रात गरम खाद्यपदार्थ बांधून ते ग्राहकांना देणे धोकादायक ठरत आहे. त्यामुळे भारतीय खाद्य सुरक्षा मानके प्राधिकरण(FSSAI) भारत सरकारने 6 डिसेंबर 2016 रोजी आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. तरी सर्व अन्न व्यावसायिक छोटे-मोठे हॉटेल्स, बेकरी व्यावसायिक, स्नॅक्स सेंटर, स्वीटमार्ट, वडापाव, भजी आणि भेळ विक्रेते यांना सुचित करण्यात येते की, वृत्तपत्रामध्ये अन्न पदार्थ पॅकींग त्वरित बंद करावे अन्यथा आपणाविरुद्ध अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2006 नियम आणि नियमन 2011 अंतर्गत योग्य ती कडक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असं अन्न औषध प्रशासन विभागाने म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

याबाबतची धोक्याची सूचना फूड, सेफ्टी अँड स्टँडर्ड अॅथोरिटी ऑफ इंडिया यांनीही याआधीच दिली आहे. त्यामुळे या नियमाचे काटेकोर पालन करण्याचे आदेश अन्न आणि औषध प्रशासनाने दिले आहेत.

त्यामुळे आता नव्या आदेशामुळे वर्तमान पत्राच्या कागदावर खाद्यपदार्थ खाता येणार नाहीत किंवा बांधूनही देता येणार नाहीत. कोणत्याही खाण्याच्या गाडीवर, फूड स्टॉल्सवर पोहे, भजी, वडा पाव, समोसे असे खाद्यपदार्थ पार्सल करून दिले जातात ते वर्तमानपत्राच्या कागदावर दिले जातात किंवा त्यात बांधून दिले जातात. अनेकदा त्याला तेलही लागलेले असते. मात्र अन्न आणि औषध प्रशासना विभागाने यावर बंदी घातली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT