Omicron : पुढचे दोन आठवडे महाराष्ट्रासाठी आव्हानात्मक, कोव्हिड टास्क फोर्सने असं का म्हटलं आहे?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाशी जो संवाद साधला त्यामध्ये हे स्पष्ट केलं आहे की जानेवारी महिन्यात 15 ते 18 या वयोगटाचं लसीकरण सुरू केलं जाणार आहे. अशात राज्य सरकारनेही यासाठीची तयारी सुरू केली आहे. तसंच ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोसही दिला जाणार आहे. अशात महाराष्ट्र कोव्हिड टास्क फोर्सने पुढचे दोन आठवडे हे कोरोनच्या दृष्टीने अत्यंत आव्हानात्मक […]
ADVERTISEMENT
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाशी जो संवाद साधला त्यामध्ये हे स्पष्ट केलं आहे की जानेवारी महिन्यात 15 ते 18 या वयोगटाचं लसीकरण सुरू केलं जाणार आहे. अशात राज्य सरकारनेही यासाठीची तयारी सुरू केली आहे. तसंच ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोसही दिला जाणार आहे. अशात महाराष्ट्र कोव्हिड टास्क फोर्सने पुढचे दोन आठवडे हे कोरोनच्या दृष्टीने अत्यंत आव्हानात्मक असतील असं म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्र कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांना आम्ही प्रश्न विचारला की मुंबईतली रूग्ण वाढ याला तिसरी लाट म्हणायचं का? त्यावर शशांक जोशी यांनी असं म्हटलं आहे की, ‘मुंबईत रूग्णसंख्या वाढते आहे. टीपीआर अर्थात टेस्ट पॉझिटिव्ही रेट 2.65 आहे. सध्या जे रूग्ण आढळत आहेत त्यांच्यात कोरोनाची सौम्य किंवा मध्यम लक्षणं आहेत. ओमिक्रॉन हा डेल्टासारखा वाटत नाहीये. पण आत्ताच निश्चितपणे याबद्दल सांगणं योग्य होणार नाही. ओमिक्रॉनचा प्रभाव किती आणि कसा पडतो ते पाहण्यासाठी दोन आठवडे वाट बघावी लागणार आहे. सध्या आपण तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहोत असं म्हणता येईल. मात्र हे दोन आठवडे अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत.’
मुंबईत रविवारी कोरोनाचे 922 रूग्ण पॉझिटिव्ह आढळले तर दोन मृत्यूंची नोंद झाली. मुंबईतल्या कोरोना रूग्ण आढळल्यामुळे सील करण्यात आलेल्या इमारतींची संख्या 22 झाली आहे. ज्यावेळी एका इमारतीत पाच किंवा पाचहून जास्त रूग्ण आढळतात तेव्हाच इमारत सील केली जाते. दुसरीकडे राज्यात रविवारी कोरोनाचे 1648 नवे रूग्ण आढळले आणि 17 मृत्यू झाले. राज्यात रविवारच्या आकडेवारीनुसार 89 हजार 251 जण होम क्वारंटाईन आहेत तर 891 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.
हे वाचलं का?
महाराष्ट्रात ओमिक्रॉन व्हेरिएंटची बाधा झालेलेही रूग्ण आढळत आहेत. राज्यात ओमिक्रॉन व्हेरिएंटने बाधित 31 रूग्ण रविवारी आढळले. त्यातले 27 रूग्ण हे एकट्या मुंबईत आढळले आहेत. राज्यात ओमिक्रॉन व्हेरिएंटने बाधित रूग्णांची संख्या 141 झाली आहे त्यातले 73 रूग्ण हे मुंबईत आहेत.
ओमिक्रॉनचे राज्यात कुठे किती रूग्ण आहेत?
ADVERTISEMENT
मुंबई – 73
ADVERTISEMENT
पिंपरी- 19
पुणे ग्रामीण-16
पुणे महापालिका-7
सातारा-5
उस्मानाबाद-5
ठाणे-3
कल्याण डोंबिवली-2
नागपूर-2
औरंगाबाद-2
बुलढाणा-1
लातूर-1
अहमदनगर-1
अकोला-1
वसई-1
नवी मुंबई-1
मीरा भाईंदर-1
ही सगळी स्थिती पाहता याबद्दल डॉ. शशांक जोशी यांना विचारलं असता पुढचे दोन आठवडे अत्यंत महत्त्वाचे आहेत. या दोन आठवड्यात काय होतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे.
तीन दिवसांपूर्वी कोव्हिड टास्क फोर्स आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर नव्या वर्षाच्या पार्टी आणि समारंभांवर बंधनं घातली आहेत. बंदिस्त जागांवर किंवा खुल्या जागांवर पार्टी करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यानंतर मुंबई महापालिका आयुक्तांनी वेगळे आदेश काढले आणि मुंबईकरांना वेगळे निर्बंध लागू केले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT