वाशिममध्ये २२ मार्चपर्यंत संचारबंदी वाढवली

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील महत्वाच्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत होणाऱ्या वाढीमुळे स्थानिक जिल्हा प्रशासनाने अनेक ठिकाणी संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. वाशिम जिल्ह्यातील रुग्णसंख्येमध्ये होणारी वाढ पाहता संचारबंदीच्या आदेशांना २२ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. वाशिमचे जिल्हाधिकारी षण्मुखराजन एस. यांनी याबद्दलचे आदेश दिले आहेत. २२ मार्च रात्री १२ वाजेपर्यंत संचारबंदीचे आदेश लागू राहतील असं जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जाहीर करण्यात आलंय.

ADVERTISEMENT

संचारबंदी काळात जिल्ह्यातील सर्व दुकाने, आस्थापना रविवारसह सातही दिवस सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच सुरू राहतील. रोज रात्री ८ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी राहील. या काळात रुग्णालये, रुग्णवाहिका, औषधं दुकाने, भाजीपाला या गोष्टी सुरू राहतील. या उद्योगाचे कर्मचारी, कामगार यांना त्यांच्या कार्यालयाच्या ओळखपत्राच्या आधारे जाण्या-येण्याकरिता परवानगी राहील.

चिंताजनक ! राज्यात एकाच दिवशी कोरोनाचे १६ हजार रुग्ण

हे वाचलं का?

घरपोच दूध वितरण, रेस्टॉरंटमधील खाद्य पदार्थांच्या घरपोच वितरणास सकाळी ६ ते सकाळी ९ वाजेपर्यंत तसेच सायंकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत मुभा राहील. जिल्ह्यात नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामीण भागातील आठवडी बाजार व गुरांचे बाजार पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. ग्राहकांनी दुकानांमध्ये खरेदी करण्यासाठी जवळपास असलेल्या बाजारपेठ, ओळखीच्या दुकानदारांना प्राधान्य द्यावं. भाजी मंडईतही किरकोळ विक्रेत्यांनाच प्रवेश मिळणार आहे. जिल्ह्यातील सर्व प्रकारची उपहारगृहे, हॉटेल, रेस्टॉरंट प्रत्यक्ष सुरू न ठेवता केवळ पार्सल सुविधा सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. सर्व धार्मिक स्थळे ही केवळ एका वेळी १० व्यक्तींपर्यंत मर्यादित स्वरूपात नागरिकांसाठी सुरू राहतील.

लग्न समारंभासाठी वधू-वरासह केवळ २५ व्यक्तींनाच उपस्थित राहता येईल. त्याकरिता नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात संबंधित नगरपालिका, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांची, तसेच ग्रामीण भागाकरिता तहसीलदार यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक राहील. लग्न समारंभ किंवा इतर छोट्या समारंभ, कार्यक्रमात २५ पेक्षा जास्त व्यक्ती आढळून आल्यास संबंधित मंगल कार्यालय, सभागृह, लॉनचे चालक अथवा मालक, व्यवस्थापक यांना आर्थिक दंड ठोठावण्यात येईल. दुसऱ्यांदा अशी बाब आढळून आल्यास मंगल कार्यालय, सभागृह, लॉन १५ दिवसांसाठी सील केले जाईल. लग्न समारंभ अथवा कोणत्याही कार्यक्रमाप्रसंगी गर्दी होणारी मिरवणूक काढता येणार नाही. आयोजकांनी लग्नस्थळी किती लोक उपस्थित राहणार आहेत, याची माहिती संबंधित पोलीस स्टेशनला कळविणे बंधनकारक राहणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT