Nilesh Rane: ‘आदित्य बोलू नकोस, नाहीतर अजून नाXX..’, राणेंची जीभ घसरली

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Nilesh Rane slip of tongue: रत्नागिरी: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shiv Sena UBT) पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी काल (24 जानेवारी) मुंबईत पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या दावोस दौऱ्यावर काही गंभीर आरोप केले होते. आता आदित्य ठाकरे यांच्या याच आरोपांना भाजप (BJP) नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पण यावेळी बोलताना निलेश राणेंची जीभ पुन्हा घसरली आहे. आदित्य ठाकरेंबाबत बोलताना निलेश राणेंनी आक्षेपार्ह शब्द वापरले आहेत. ते रत्नागिरीत बोलत होते. (nilesh ranes tongue slips while criticizing aditya thackeray for asking questions about chief ministers visit to davos)

‘तू परदेशात काय-काय करतोस.. संध्याकाळी काय करतोस. याबाबत नको बोलूस अजून नाXX होशील. मुख्यमंत्री उशिरा की लवकर पोहचले हे तुला कसं कळणार? तुझी कोण आहे का तिकडे दावोसला?’ असं म्हणत निलेश राणे पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंबाबत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

Rane: ‘त्या XXX उद्धव ठाकरेला पण सांग’, निलेश राणेंनीही सोडली पातळी

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘तुझ्या दावोस ट्रिपनंतर तुझे मित्र लंडनमध्ये नाXX नाच करत होते’

‘आदित्य ठाकरेला हे कसं कळलं की, मुख्यमंत्री साहेब उशिरा पोहचले? आदित्य ठाकरे काय तिकडे दरवाज्यावर उभे होते काय. अरे बाबा.. जेव्हा तो दावोसला गेला होता तू त्यानंतर 15 दिवस लंडनला सुट्टी घेतलीस. तुझे ते सगळे वरुण सरदेसाई, मित्र हे लंडनला नाxx नाच करत होते. तुझ्या या दावोसच्या ट्रीपनंतर. तू काही बोलूच नको.’ अशी टीका करत निलेश राणेंनी

‘तू परदेशात काय-काय करतोस.. संध्याकाळी काय करतोस. याबाबत नको बोलूस अजून नाXX होशील. मुख्यमंत्री उशिरा की लवकर पोहचले हे तुला कसं कळणार? तुझी कोण आहे का तिकडे दावोसला? लग्न तिकडे केलं आहेस का? तुला माहित कसं?’

ADVERTISEMENT

‘समजा, उशीर झाला असेल 10-15 मिनिटं पण ह्याला माहित कसं पडलं? याचे हेर आहेत की का?’

ADVERTISEMENT

‘म्हणून आदित्य ठाकरेने परदेशाचं काय बोलू नये. मागच्या वेळेस हा दावोसला गेला होता. त्यानंतर 15 दिवस हा देशात आला नव्हता. कुठे होतास तू? लंडनला काय करत होता? दावोस दोन-तीन दिवसाचं.. शिंदे साहेब तीन दिवसात मुंबईत परत आले.’

‘तुझ्या दावोस टूरनंतर तू 15 दिवसांनी लंडनमधून परत आला. तर 15 दिवस लंडनला काय करत होतास? नाही त्या हाय लेव्हलच्या गोष्टी करू नकोस. तू अजून मुंबईचे गार्डन वैगरे बनव. त्याची मुख्यमंत्र्यांबाबत बोलायची उंची नाही.’ अशी विखारी टीका निलेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर केली आहे.

आदित्य ठाकरेंवर टीका करताना निलेश राणेंची पातळी घसरली, समलैंगिक समुदायाचाही अपमान

‘फडणवीस कधी हवेत गोळीबार करत नाही’

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल एका कार्यक्रमात असं वक्तव्य केलं होतं की, अडीच वर्षाच्या काळात महाविकास आघाडी सरकारने त्यांना तुरुंगात टाकण्यासाठी बरेच प्रयत्न केले होते. यावर देखील निलेश राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘फडणवीस साहेबांना काही तरी माहित असेल तेव्हाच त्यांनी असं वक्तव्य केलं असेल. फडणवीस साहेब कधीच हवेत गोळीबार करत नाहीत. त्यांना नक्की माहिती असेल आणि डिपार्टमेंटकडून देखील माहिती मिळाली असेल की कट होता.’

‘तुम्ही अडीच वर्षातील ठाकरे सरकारचं काम बघितलं असेल तर यांना अडकवा, त्यांना अडकवा याच्या पलिकडे ठाकरे सरकार कधी गेलंच नाही. एक तर कोरोनामध्ये चोरी करायची आणि मोठ्या नेत्यांना अडकवायचं. ही दोनच कामं ठाकरे सरकारमध्ये झाली. आपल्याला आठवत असेल विरोधी पक्षाला मिळालेल्या प्रीव्हिलेजच्या विरोधात नोटीस बजावण्यात आली. खरं तर प्रीव्हिलेज विरोधी पक्षाचं असतं तरीही पोलिसांनी त्याला नोटीस पाठवली. म्हणजे किरकोळ केस..’

‘एक तर ठाकरेंना नियम-कायदे माहित नाही. त्यांना काही करुन लोकांना अडकवायंचं असतं. राणे साहेबांबद्दल तेच झालं. यातच त्यांची अडीच वर्ष गेली. काम केलं काहीच नाही. त्यांना वाटलं की, आयुष्यभरासाठी मुख्यमंत्रीपद मिळालं. म्हणून मजा मारायची. पण कधी त्यांच्या पायाखालून मुख्यमंत्री पद गेलं ते कळालंही नाही त्यांना. नियतीने त्यांना धडा शिकवला. त्यामुळे फडणवीस साहेब जे बोलले त्यात तथ्य असणार.’ असा दावा निलेश राणेंनी यावेळी केला आहे.

‘ही लोकं नीच प्रवृत्तीची आहेत, ते निवडणूक लढवणारच’

याचवेळी निलेश राणेंनी पिंपरी-चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीबाबत देखील प्रतिक्रिया देताना महाविकास आघाडीवर जहरी टीका केली आहे.

ते म्हणाले की, ‘श्रीमती लटके मॅडमची म्हणजे अंधेरीची पोटनिवडणूक आठवत असेल. जेव्हा त्यांच्या पतीचं निधन झालं तेव्हा भाजपने ती पोटनिवडणूक लढवली नाही. त्यावर एवढं राजकारण केलं की, गेलेल्या माणसासमोर तुम्ही निवडणूक लढवताय. ज्या नीच प्रवृत्तीची ही लोकं आहे. मी तुम्हाला सांगतो की, ते पिंपरी-चिंचवडची जी जागा होती ती जागा हे लोकं लढवणार. त्यांना माणुसकी वैगरे काही नाही.’

‘मनसेचे वांजळे गेले होते ते तुम्हाला माहिती आहे ना. आता वांजळे वहिनी या उभ्या राहायला हव्या होत्या मनसेतून त्यांना तिकीट कोणी दिलं तर राष्ट्रवादीने. राजसाहेबांनी ती निवडणूक लढवली नाही. माणुसकीशून्य असलेली ही मंडळी आहेत. त्यामुळे पिंपरीची जागा हे लोकं 100 टक्के लढवणार. कारण त्यांना ते संख्याबळ पाहिजे. त्यामध्ये राजकारण करायचं. पण टीका भाजपवर करायची. मात्र, आता हे तिघेही साम-दाम करुन निवडणुकीत उतरणार.’ असं म्हणत निलेश राणेंनी आपल्या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरेंसह महाविकास आघाडीवर पातळी ओलांडून टीका केली.

त्यामुळे आता आदित्य ठाकरे किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून त्यांच्या या टिकेला नेमकं काय उत्तर मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT