निंबाळकर-पाटील भावकीत कधी पडली संघर्षाची पहिली ठिणगी? दोन पिढ्यांतील ‘रक्त’रंजित इतिहास!
उस्मानाबाद: सध्या उस्मानाबाद जिल्ह्याचे उद्धव ठाकरे गटाचे खासदार ओम राजेनिंबाळकर (Omraje Nimbalkar) आणि भाजपचे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील (Ranajagjitsinha Patil) यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील पीकविम्याच्या श्रेयवादाची लढाई सध्या सुरु आहे. यावरुनच शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पाटील आणि निंबाळकर यांच्याच हमरीतुमरी झाली. तुझी औकात काय? पार इथपर्यंत खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी राणा […]
ADVERTISEMENT

उस्मानाबाद: सध्या उस्मानाबाद जिल्ह्याचे उद्धव ठाकरे गटाचे खासदार ओम राजेनिंबाळकर (Omraje Nimbalkar) आणि भाजपचे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील (Ranajagjitsinha Patil) यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील पीकविम्याच्या श्रेयवादाची लढाई सध्या सुरु आहे. यावरुनच शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पाटील आणि निंबाळकर यांच्याच हमरीतुमरी झाली. तुझी औकात काय? पार इथपर्यंत खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी राणा पाटील यांना सुनावलं तर राणा पाटील यांनी देखील ‘बाळा’ म्हणून खासदारांना हिनवलं. (nimbalkar patil enmity in osmanabad what exactly is the controversy)
याची चर्चा दिवसभर उस्मानाबाद जिल्ह्यात सुरु होती. अखेर रात्री राणा पाटील यांचे चिरंजीव मल्हार पाटील यांनी ओमराजेंचा एकेरी उल्लेख करत नको त्या गोष्टींचा उल्लेख करत गाठ माझ्याशी आहे, असा इशारा देऊन टाकला. आता हा वाद आणखी पेटण्याचे चिन्हे आहेत. कारण येणारा काळ हा निवडणुकांचा काळ आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात येणाऱ्या काळात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेसह नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहे. दोन्ही नेत्याचे कार्यकर्ते देखील एकमेकांना पाण्यात पाहतात. अनेकदा दोन्ही गटात वाद पाहायला मिळाला आहे. आता पाटील आणि निंबाळकर यांच्यातला वाद काय आहे, वादाचं नेमकं कारण काय, हे आपण यातून जाणून घेणार आहोत.
ओमराजे निंबाळकर-राणा जगजितसिंह पाटील : दोघांमध्ये नातेसंबध काय?
या वादाला जाणून घेण्याच्या पूर्वी पाटील आणि निंबाळकर यांच्यात नातेसंबध काय आहेत, हे जाणून घेणं गरजेचं आहे. भूपालसिंह राजेनिंबाळकर यांना सात मुलांपैकी संताजी आणि बाजीराव असे दोन मुलं होती. बाजीराव यांना तेरच्या पाटलांनी दत्तक घेतलं. बाजीराव पाटलांच्या 7 मुलांपैकी पद्मसिंह पाटील हे एक. तर संताजी राजेनिंबळाकर यांचे पवनराजे निंबाळकर हे सुपुत्र. म्हणजे पवनराजे संताजी निंबाळकर आणि पद्मसिंह बाजीराव पाटील हे सख्खे चुलत भाऊ. राणाजगजित सिंह पद्मसिंह पाटील आणि ओमराजे पवनराजे निंबाळकर त्या नात्याने चुलत-चुलत भाऊ, असे यांच्यातील नातेसंबध.
पवनराजेंची हत्या: निंबाळकर-पाटलांच्या राजकीय वैमनस्याचा रक्तरंजित इतिहास









