Nirav Modi ला झटका, लंडन कोर्टाने दिली प्रत्यार्पणाला मंजुरी
पीएनबी बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदीची याचिका आज लंडन कोर्टाने फेटाळली असून त्याच्या भारतातील प्रत्यार्पणाला मंजुरी दिली आहे. भारताने त्याच्या प्रत्यापर्णाची मागणी केली आहे ती योग्य आहे ती आम्ही मंजूर करत आहोत असं लंडन कोर्टाने म्हटलं आहे. यामुळे नीरव मोदीला मोठा झटका बसला आहे. मुंबईतल्या ऑर्थर रोड तुरूंगातील बराक क्रमांक १२ नीरव मोदीसाठी योग्य […]
ADVERTISEMENT

पीएनबी बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदीची याचिका आज लंडन कोर्टाने फेटाळली असून त्याच्या भारतातील प्रत्यार्पणाला मंजुरी दिली आहे. भारताने त्याच्या प्रत्यापर्णाची मागणी केली आहे ती योग्य आहे ती आम्ही मंजूर करत आहोत असं लंडन कोर्टाने म्हटलं आहे. यामुळे नीरव मोदीला मोठा झटका बसला आहे. मुंबईतल्या ऑर्थर रोड तुरूंगातील बराक क्रमांक १२ नीरव मोदीसाठी योग्य आहे असंही लंडन कोर्टाने म्हटलं आहे.
काय म्हटलं आहे लंडन कोर्टाने?
वेस्टमिंस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टाचे न्यायाधीश सॅम्यअल गोजी यांनी या संदर्भातला निर्णय देताना असं म्हटलं आहे की, “नीरव मोदीला भारतात बऱ्याच प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. भारतात तो दोषी ठरणार यात काहीही शंका नाही. नीरव मोदीच्या वतीने जी काही कबुली देण्यात आली त्यामध्ये परस्परविरोध दिसतो आहे. पहिल्याच फटक्यात समजून जातं की सगळे पुरावे हे नीरव मोदीच्या विरोधात आहेत. भारताची न्यायव्यवस्था निष्पक्षपाती आहे. त्यामुळे भारतात नीरव मोदीचं प्रत्यार्पण केलंच पाहिजे.” असं म्हणत नीरव मोदीने केलेली याचिका लंडन कोर्टाने फेटाळली आहे.