मोठी बातमी: ‘अनिल देशमुखांविरोधात पुरावे नाहीत, CBI ने दिली होती क्लीनचीट’, सचिन सावंतांचा दावा
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हायकोर्टाच्या आदेशानुसार अनिल देशमुखांवर 100 कोटींच्या वसुलीचे जे आरोप करण्यात आले होते. त्याप्रकरणी सीबीआय प्राथमिक चौकशी केली होती. याच चौकशीअंती सीबीआयने अहवालात स्पष्ट केलं होतं की, अनिल देशमुख यांच्याविरोधात याप्रकरणी कोणताही पुरावा सापडलेला नाही. त्यामुळे पुढील कारवाई थांबविण्यात […]
ADVERTISEMENT

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हायकोर्टाच्या आदेशानुसार अनिल देशमुखांवर 100 कोटींच्या वसुलीचे जे आरोप करण्यात आले होते. त्याप्रकरणी सीबीआय प्राथमिक चौकशी केली होती. याच चौकशीअंती सीबीआयने अहवालात स्पष्ट केलं होतं की, अनिल देशमुख यांच्याविरोधात याप्रकरणी कोणताही पुरावा सापडलेला नाही. त्यामुळे पुढील कारवाई थांबविण्यात यावी. असा दावा काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी केला आहे.
दरम्यान, आता सीबीआयचा प्राथमिक अहवालाचे जे कागदपत्र समोर आले आहेत. त्यानुसार सकृतदर्शनी असं दिसून येत आहे की, यामध्ये अनिल देशमुखांना क्लिन चीट देण्यात आली होती. सीबीआयच्या अहवालातील महत्त्वाची कागदपत्र ही देशमुखांच्या जवळील सूत्रांकडून मिळाली आहेत. मात्र, या अहवालाची सत्यता अद्याप अधिकृतरित्या समोर आलेली नाही.
‘त्या’ कथित अहवालात नेमकं काय म्हटलंय?
सीबीआयचा कथित अहवाल हा 65 पानी आहे. याच कथित अहवालात सीबीआयचे उपअधिक्षक आर. एस. गुंजयाल यांनी असं म्हटलं होतं की, ‘तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख किंवा त्यांचे पीएस संजीव पालांडे यांनी ऑर्केस्टा, बार, हुक्का पार्लर यांच्याकडून पैसे वसूल करावे अशी मागणी केल्याचे कोणतेही पुरावे आढळून आलेले नाहीत. त्यामुळे याप्रकरणी चौकशी बंद करण्यात यावी.’