टोल प्लाझावरुन अवघ्या दहा सेकंदात होणार सुटका, जाणून घ्या नवीन नियमावली

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

हर्षदा परब: अवघ्या 10 सेकंदात टोल प्लाझावरुन सुटका आणि 100 मीटर पेक्षा जास्त रांग नाही असा खात्रीने जलद प्रवासाची हमी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण देणार आहे. कारण तशा गाईडलाईन्सच प्राधिकरणातर्फे काढण्यात आल्या आहेत. तसंच पुढच्या दहा वर्षांचा विचार करून टोल प्लाझांमध्ये बदलही करण्यात येणार आहेत.

टोल प्लाझा वर वाहनांना कमीत कमी वेळ थांबावं लागावं यासाठी नवीन गाईडलाईन्स भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणातर्फे काढण्यात आले आहेत. ज्यानुसार 100 टक्के वाहनांना फास्ट टॅग लागल्यानंतर या टोल प्लाझावर 10 सेकेंदा पेक्षा जास्त वाहनांना थांबवता येणार नाही आणि 100 मीटर लांब रांग टोल प्लाझावर दिसू नये यासाठी नियम करण्यात आला आहे. गर्दीच्यावेळी विनाअडथळा प्रवास व्हावा या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे.

जर, एखाद्या टोल प्लाझावर 100 मीटरपेक्षा जास्त लांब रांग असेल तर रांगेची लांबी 100 मीटरपर्यंतच राहील याची काळजी घेण्यात येणार आहे. त्यासाठी टोल बूथ पासून रांगेत असलेल्या काही वाहनांना टोल प्लाझावरुन टोल न भरता जाऊ देण्याची सुचनाही या नियमावलीत नमूद करण्यात आली आहे. प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार नॅशनल हायवेवर 96 टक्के गाड्यांना फास्ट टॅग लावण्यात आलं आहे तर काही टोल प्लाझावर हे प्रमाण 99 टक्क्यांवर पोहोचलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पिवळी लाईन असेल

प्रत्येक टोल प्लाझावर 100 मीटर लांब रांग ओळखण्यासाठी पिवळी पट्टी लावण्यात येणार आहे. जेणेकरुन टोल ऑपरेटरला जबाबदार धरणं सोपं जाणार आहे.

ADVERTISEMENT

सोशल डिस्टन्सिंगचाही विचार

ADVERTISEMENT

सोशल डिस्टन्सिंग हा नवीन नियम झाल्याने चालक आणि टोल ऑपरेट यांच्यात येणारा मानवी संपर्क टाळण्यासाठी प्रवासी टोल भरताना फास्ट टॅगसाठी आग्रही आहेत. अशी माहितीही प्राधिकरणातर्फे देण्यात आली आहे.

टोल प्लाझा बदलणार

इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टोल जमा करणं वाढत असल्यामुळे राष्ट्रीय महामार्गांवरील टोलमध्ये बदल करण्यात येणार आहे. पुढच्या 10 वर्षांचा विचार करून आधुनिक पद्धतीने या टोलची रचना आणि बांधणी करण्यात येणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT