उस्मानाबादेत तेलाचा टँकर उलटला, स्थानिकांची तेल पळवण्यासाठी गर्दी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

उस्मानाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र 11 वरील तुळजापूर तालुक्यातील सांगवी गावाजवळ गोडतेलचा टँकर रस्त्यावर पलटी होऊन भीषण अपघात झाला. गोडतेलाच्या टँकरला झालेल्या अपघातात सांडलेलं तेल घरी नेण्यासाठी यावेळी स्थानिक लोकांनी तोबा गर्दी केली.

ADVERTISEMENT

गुजरातमधील राजकोटवरुन तेलाने भरलेला हा टँकर बंगळुरुला जाण्यासाठी निघाला होता. सांगवीजवळ टँकरचं स्टेअरिंग बिघडल्यामुळे टँकरचा अपघात झाल्याचं कळतंय.

या अपघातात टँकरला भगदाड पडून मोठ्या प्रमाणात तेलगळतीला सुरुवात झाली. स्थानिक लोकांना याबद्दल माहिती कळताच, फुकटच्या गोडतेलावर हात मारण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. महागाईच्या झळीने होरपळलेल्या नागरिकांनी घागर, कळशी,टाकी अन् मिळेल त्या भांड्यामध्ये तसेच मिळेल त्या वाहनाच्या सहाय्याने गोडतेलं लंपास केलं. पोलीस प्रशासनाला याबद्दल माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी येऊन जमावाला पांगवलं. परंतू तोपर्यंत नागरिकांनी तेलावर डल्ला मारला होता.

हे वाचलं का?

या अपघातात सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. टँकरच्या अपघातात एक उस घेऊन जाणाऱ्या ट्रॉलीचाही अपघात झाल्यामुळे रस्त्यावर उस पडला. या अपघातामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती, पोलिसांनी नंतर अपघातग्रस्त वाहनं बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली.

ADVERTISEMENT

टँकरमध्ये उकळत्या डांबराचा स्फोट होऊन भीषण आग, दोन जण ठार तिघांची प्रकृती गंभीर

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT