नाशिक हादरलं! घरात घुसून गोळीबार, कोयत्याने हल्ला; महिला थोडक्यात बचावली
Nashik open firing Case : नाशिकच्या फुलेनगर परीसरात जुन्या वादातून एका कुटूंबियांवर घरात घुसून कोयत्याने आणि गोळ्या झाडून हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलीय. या घटनेत अंधाधूंद करण्यात आलेल्या गोळीबारात (open firing) गोळी अंगाला चाटून गेल्याने महिला जखमी झाली होती.उषा महाले असे या घटनेत जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.ही संपूर्ण घटना सीसीटीव्हित (cctv)कैद झाली आहे. या […]
ADVERTISEMENT
Nashik open firing Case : नाशिकच्या फुलेनगर परीसरात जुन्या वादातून एका कुटूंबियांवर घरात घुसून कोयत्याने आणि गोळ्या झाडून हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलीय. या घटनेत अंधाधूंद करण्यात आलेल्या गोळीबारात (open firing) गोळी अंगाला चाटून गेल्याने महिला जखमी झाली होती.उषा महाले असे या घटनेत जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.ही संपूर्ण घटना सीसीटीव्हित (cctv)कैद झाली आहे. या घटनेनंतर पोलिसात (Police)तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी मारहानीचा गुन्हा दाखल केला असून तपास सूरू आहे. (old dispute 7-8 boy koyta and open firing on family nashik incident)
ADVERTISEMENT
नाशिक शहर शनिवारी रात्री एका धक्कादायक घटनेने हादरले आहे. फुलेनगर परिसरात जुन्या वादातून (old dispute) काही ७-८ जणांच्या तरूणांच्या टोळक्याने रात्री आठ वाजेच्या सुमारास महिलेवर आणि मुलावर हल्ला केला.या टोळक्याने पहिल्यांदा मुलावर कोयत्याने वार केला. मात्र त्याने तो चुकवून पळ काढला होता. एवढ्यावरच न थांबता हल्लेखोरांनी थेट महाले यांच्या घरावर हल्ला करत गोळीबार केला. या घटनेचा जाब विचारायला आलेल्या उषा महाले यांच्या दिशेने हल्लेखोरांनी बंदुकीतून फायरिंग देखील केली. सुदैवाने उषा महाले यांच्या छाती जवळून ही गोळी चाटून गेल्याने त्या थोडक्यात बचावल्या आहेत. उषा महाले या गंभीर जखमी आहेत. या घटनेत जवळ जवळ चार राउंड फायर केल्यानंतर घटनास्थळाहुन हल्लेखोरांनी पळ काढला होता. ही संपुर्ण घटना परिसरात असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
kirtikumar bhangdiya: फडणवीसांच्या निकटवर्तीय आमदारावर गुन्हा, प्रकरण काय?
हे वाचलं का?
नाशिकमध्ये गेल्या काही महिन्यांपासून गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. नाशिकमध्ये क्षुल्लक करणाहून जुन्या वादातुन थेट जीवघेणे हल्ले केले जात असून,मागच्याच आठवड्यात दिवसाढवळ्या भररस्त्यात निमानी भागात एकाची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा फुलेनगर भागात ही गोळीबारची घटना घडलीय. त्यामुळे नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. दरम्यान या प्रकरणात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सूरू होते. पोलिसांनी या प्रकरणात मारहाणीचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी अधिक तपास सूरू आहे.
चिकन न बनवल्याने भडकला, पत्नीचं डोकं फोडतं हातही तोडला
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT