बेफिकीरीचा कळस ! Omicron ची लागण झालेलं कुटुंब गेलं सहलीला, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
– मिथीलेश गुप्ता, उल्हासनगर प्रतिनिधी सध्या राज्यभरात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने चांगलाच धुमाकुळ घातला आहे. प्रत्येक दिवशी रुग्णसंख्येत होणारी वाढ ही आरोग्य यंत्रणांच्या काळजीत भर घालते आहे. अशा परिस्थितीत बाहेरील देशांतून येणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी प्रशासनाने क्वारंटाईन आणि कोरोना चाचणी सक्तीची केली आहे. परंतू असं असतानाही उल्हासनगरातलं एक कुटुंब नियम मोडून सहलीला बाहेर गेलं. याचदरम्यान या परिवारातील […]
ADVERTISEMENT
– मिथीलेश गुप्ता, उल्हासनगर प्रतिनिधी
ADVERTISEMENT
सध्या राज्यभरात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने चांगलाच धुमाकुळ घातला आहे. प्रत्येक दिवशी रुग्णसंख्येत होणारी वाढ ही आरोग्य यंत्रणांच्या काळजीत भर घालते आहे. अशा परिस्थितीत बाहेरील देशांतून येणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी प्रशासनाने क्वारंटाईन आणि कोरोना चाचणी सक्तीची केली आहे. परंतू असं असतानाही उल्हासनगरातलं एक कुटुंब नियम मोडून सहलीला बाहेर गेलं. याचदरम्यान या परिवारातील तिघांना ओमिक्रॉनची बाधा झाल्याचं पुढे आलं.
महापालिकेचे अधिकारी जेव्हा या तीन सदस्यांना क्वारंटाईन करण्यासाठी गेले असता हे कुटुंब सहलीला गेल्याचं कळताच त्यांच्याही पायाखालची जमीन सरकली. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
हे वाचलं का?
AIIMS ने सांगितली ओमिक्रॉनची पाच धोकादायक लक्षणं, दिसली तर लगेच डॉक्टरांकडे जा
उल्हासनगर महानगरपालिका परीक्षेत्रात एक कुटुंब केनियावरुन आलं होतं. ज्यानंतर महापालिकेने या परिवाराची RT-PCR चाचाणी घेतली. या चाचणीचा निकाल येईपर्यंत या कुटुंबाने स्वतःला क्वारंटाईन करुन सर्व नियमांचं पालन करणं गरजेचं होतं. परंतू असं न करता हे कुटुंब काश्मीर-वैष्णोदेवी, अमृतसर इथे सहलीला निघून गेलं.
ADVERTISEMENT
Omicron : ओमिक्रॉन व्हेरिएंटला हलक्यात घेऊ नका, WHO च्या प्रमुखांनी दिला इशारा
ADVERTISEMENT
यानंतर काही दिवसांनी या चारही जणांच्या RT-PCR चाचणीचा निकाल आला ज्यात तीन सदस्यांना ओमिक्रॉनची बाधा झाल्याचं निष्पन्न झालं. वैद्यकीय अधिकारी या तिन्ही सदस्यांना क्वारंटाईन करण्यासाठी गेले असता त्यांना हे कुटुंब सहलीला गेल्याचं कळलं. ३१ डिसेंबरला हे कुटुंब उल्हासनगरात परपत आलं, ज्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांनी सरकारी नियमांचा भंग केल्याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
भारतात कोरोनाची तिसरी लाट उच्चांक कधी गाठणार? कधी संपणार कहर? IIS च्या संशोधकांनी दिलं उत्तर
एकीकडे सरकारी यंत्रणा ओमिक्रॉनची बाधा होऊ नये यासाठी कसोशीने प्रयत्न करत असताना अशा पद्धतीने नागरिकांकडून होणारं उल्लंघन हे चिंतेत भर घालणारं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT