Omicron symptom : ओमिक्रॉनचं आणखी एक त्रासदायक लक्षण आलं समोर, कानावरही होतोय परिणाम
कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटने जगभरात धुमाकूळ घातला आहे. डेल्टापेक्षा अधिक वेगानं संसर्ग होत असलेल्या ओमिक्रॉनची अनेक लक्षणं आतापर्यंत समोर आली आहे. त्यात आता आणखी एका त्रासदायक लक्षणाची भर पडली आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्यानंतर कानावरही परिणाम होत असून, संसर्गानंतर कानातही त्रास होत आहे. कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग झाल्यानंतर २० पेक्षा अधिक लक्षणं आढळून येत आहे. त्यामुळे फ्लू […]
ADVERTISEMENT

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटने जगभरात धुमाकूळ घातला आहे. डेल्टापेक्षा अधिक वेगानं संसर्ग होत असलेल्या ओमिक्रॉनची अनेक लक्षणं आतापर्यंत समोर आली आहे. त्यात आता आणखी एका त्रासदायक लक्षणाची भर पडली आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्यानंतर कानावरही परिणाम होत असून, संसर्गानंतर कानातही त्रास होत आहे.
कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग झाल्यानंतर २० पेक्षा अधिक लक्षणं आढळून येत आहे. त्यामुळे फ्लू आणि ओमिक्रॉन हे ओळखणं जिकिरीचं झालं आहे. संसर्ग झाल्यानंतर व्यक्तीला वेगवेगळ्या स्वरूपाचा त्रास होत असून, कोरोना लसीचे दोन्ही डोज घेतलेल्यांमध्ये आणखी एक लक्षणं आढळून आलं आहे.
Omicron Symptoms: ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्यानंतर दिसून येेतात ही 20 लक्षणं
ओमिक्रॉन व्हेरियंट शरीरातील वेगवेगळ्या अवयवांवर हल्ला करत आहे. ह्रदय, मेंदू आणि डोळ्यांबरोबरच आता हा विषाणू कानावरही हल्ला करु लागला आहे. ओमिक्रॉनच्या संसर्गानंतर कानातही त्रास होत असल्याचं आढळून आलं आहे. कानात झणझण होणं, शिटी वाजल्यासारखा आवाज येणं अशा स्वरूपाची लक्षणं काही रुग्णांमध्ये् आढळून आली आहेत.