Shiv Sena Vs Governor: ‘ती’ फाईल भूतांनी पळवली, राजभवनात एकदा शांतीयज्ञ करावा लागेल, ‘सामना’तून बोचरी टीका

मुंबई तक

मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) महाविकास आघाडीचं (Mahavikas aghadi) सरकार सत्तेत आल्यापासून राज्यपाल (Governor) विरुद्ध सरकार (Government) असं चित्र सातत्याने पाहायला मिळत आहे. त्यातही शिवसेना (Shiv Sena) आणि राज्यपाल यांच्यातून विस्तव जात नसल्याचं दिसून येत आहे. आता जवळजवळ 6 महिन्यांपासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मंत्रिमंडळाने सुचवलेल्या विधान परिषदेतील 12 नामनियुक्त सदस्यांची नियुक्तीच केलेली नाही. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) महाविकास आघाडीचं (Mahavikas aghadi) सरकार सत्तेत आल्यापासून राज्यपाल (Governor) विरुद्ध सरकार (Government) असं चित्र सातत्याने पाहायला मिळत आहे. त्यातही शिवसेना (Shiv Sena) आणि राज्यपाल यांच्यातून विस्तव जात नसल्याचं दिसून येत आहे. आता जवळजवळ 6 महिन्यांपासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मंत्रिमंडळाने सुचवलेल्या विधान परिषदेतील 12 नामनियुक्त सदस्यांची नियुक्तीच केलेली नाही. त्यावरुन आता शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून अतिशय बोचरी टीका करण्यात आली आहे.

‘राज्यपाल सहा महिन्यांपासून एका फाईलचे राजकारण करीत आहेत. आता तर ती फाईलही भुतांनी पळविली. राजभवनात अलीकडे कोणत्या भुताटकीचा वावर वाढला आहे? एकदा शांतीयज्ञ करून घ्यावा लागेल!’ अशा शब्दात शिवसेनेने आता थेट राज्यपालांवर निशाणा साधला आहे. त्यामुळे आता यावरुन पुन्हा एकदा राजकारण तापण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.

पाहा ‘सामना’च्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे:

  • गतिमान प्रशासनाच्या व्याख्येत महाराष्ट्राचे राजभवन बसत नाही काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या प. बंगाल आणि महाराष्ट्राचे राज्यपाल जरा जास्तच चर्चेत असतात. प. बंगालचे राज्यपाल जगदीश धनकड हे अती वेगवान तर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे काही बाबतीत मंद गतीचे झाले आहेत.

हे वाचलं का?