तीन मुलांच्या आईचं ऑनलाइन सूत जुळलं! शेवटी प्रियकराने…
ऑनलाइन चॅटिंग, व्हिडीओ कॉलिंगनंतर महिलेचं एका अनोळखी व्यक्तीवर प्रेम जडलं. अखेर 80 लाख रूपयांहून अधिक रुपये उकळून प्रियकर फरार झाला. ही घटना एका 42 वर्षीय महिलेसोबत घडली आहे.
ADVERTISEMENT
Online romance Scam : ऑनलाइन चॅटिंग, व्हिडीओ कॉलिंगनंतर महिलेचं एका अनोळखी व्यक्तीवर प्रेम जडलं. अखेर 80 लाख रूपयांहून अधिक रुपये उकळून प्रियकर फरार झाला. ही घटना एका 42 वर्षीय महिलेसोबत घडली आहे. या महिलेचा तिच्या पतीसोबत घटस्फोट झाला होता. तिला तीन मुलंही आहेत. पण नवीन जीवनाच्या शोधात ती अशा व्यक्तीच्या प्रेमात पडली ज्याने तिची सर्व जमापुंजी लुटली आणि लाखोंची फसवणूक केली. हा धक्कादायक प्रकार अमेरिकेतील फिलाडेल्फियामध्ये घडला आहे. (Online romance Scam With A American Women Who is Mother of 3 Children)
मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेचे नाव रेबेका होलोवे आहे. एका डेटिंग अॅपवर तिची फ्रेड नावाच्या व्यक्तीसोबत ओळख झाली होती. फ्रेडने त्याची ओळख एक फ्रेंच उद्योजक म्हणून केली होती. काही दिवस चॅटिंग आणि व्हिडीओ कॉलिंगनंतर रेबेका आणि फ्रेड यांचं सुत जुळलं. त्यांचं प्रेमप्रकरण सुरू झालं.
Ravindra Chavan : “एकनाथ शिंदेंच्या बंडाचं भाजपने दिल्लीत केले प्लानिंग, फडणवीस होते…”
रेबेका आणि फ्रेड यांचे रोज बोलणे होऊ लागले आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात कधी झाले ते कळले नाही. रेबेका फ्रेडवर आंधळेपणाने विश्वास ठेवू लागली. याचा फायदा घेत फ्रेडने रेबेकाला क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास राजी केले. फ्रेडचं सर्व म्हणणं ऐकत रेबेकाने फेक योजनेत हप्त्यांमध्ये 80 लाखांहून अधिक रुपयांची गुंतवणूक केली.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
यानंतर फ्रेडचे रेबेकाला फोन कॉल्स, मेसेज किंवा व्हिडीओ कॉल्स कमी झाले. काही दिवसांनी ते पूर्णपणेच बंद झाले. यामुळे रेबेकाला संशय आला, म्हणून तिने स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला. जिथे तिला समजले की ती ‘रोमान्स स्कॅम’ची बळी ठरली आहे. असे घोटाळेबाज अविवाहित महिलांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात आणि नंतर फसवणूक करून पळून जातात. विविध फसवणूक योजनांमध्ये पैसे गुंतवण्याच्या बहाण्याने घोटाळेबाज महिलांना लुटतात.
Covid Centre scam : ठाकरेंच्या नेत्यांना अडचणीत आणणारं ‘हे’ प्रकरण काय?
याबाबत सांगत रेबेका होलोवे म्हणाली, ‘हे सगळं एखाद्या चित्रपटासारखं घडलं. अचानक माझ्या आजूबाजूचे सर्व काही अंधुक झाले. मी माझे पैसे परत मिळवण्याचा प्रयत्न देखील केला नाही, कारण मला माहित होते की मला ते सर्व मिळणार नाही. सत्य माहीत असताना माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती.’
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT