Pegasus-Farmer Bill वरून राज्यसभेत विरोधकांचा राडा आणि फाईलफेक, लाज आणली म्हणत भाजपची टीका
पेगासस स्पायवेअर आणि शेतकरी कायद्यांवर चर्चेपासून सरकार पळ काढतं आहे असं म्हणत राज्यसभेत विरोधकांनी तुफान राडा घातला. एका खासदाराने टेबलवर चढून फाईलही अध्यक्षांच्या दिशेने भिरकावली. हे सरकार ब्लफ सरकार आहे म्हणजेच फसवणूक करणारं सरकार आहे असं म्हणत हा राडा घालण्यात आला. तृणमूलचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी यासंदर्भातलं ट्विट करून सरकारवर टीका केली आहे. काय […]
ADVERTISEMENT

पेगासस स्पायवेअर आणि शेतकरी कायद्यांवर चर्चेपासून सरकार पळ काढतं आहे असं म्हणत राज्यसभेत विरोधकांनी तुफान राडा घातला. एका खासदाराने टेबलवर चढून फाईलही अध्यक्षांच्या दिशेने भिरकावली. हे सरकार ब्लफ सरकार आहे म्हणजेच फसवणूक करणारं सरकार आहे असं म्हणत हा राडा घालण्यात आला. तृणमूलचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी यासंदर्भातलं ट्विट करून सरकारवर टीका केली आहे.
काय म्हणालेत डेरेक ओ ब्रायन?
सप्टेंबर 2020 ची पुनरावृत्ती आज राज्यसभेत पाहण्यास मिळाली. सगळ्या विरोधकांचं हेच म्हणणं आहे की मोदी सरकार म्हणजे फसवणूक करणारं सरकार आहे. रस्त्यावर शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू आहे आणि सभागृहात विरोधी बाकांवरच्या खासदारांचा. पण तरीही मोदी सरकार पेगासस आणि शेतकरी कायदे या दोन्ही मुद्द्यांवर पळ काढतं आहे. सरकार कसं पळपुटं आहे आणि त्यांचा निषेध कशा प्रकारे केला जातो आहे हे सांगण्यासाठी डेरेक यांनी एक व्हीडिओही ट्विट केला आहे. यामध्ये विरोधी बाकांवरचे खासदार अध्यक्षांच्या खुर्चीसमोर आले आहेत. वेलमधे उतरून राडा घालताना दिसत आहेत. सरकारविरोधी घोषणाही देत आहेत.
विरोधकांनी लाज आणली