OYO फाऊंडर रितेश अग्रवालांना धक्का, लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
Oyo founder ritesh agarwal father dies : ओयोचे फाऊंडर (Oyo Rooms) रितेश अग्रवाल यांचे वडील रमेश अग्रवाल (Ritesh Agarwal)यांचे निधन झाल्याची दु:खद घटना घडली आहे. गुरूग्रामच्या एका उचं इमारतीतून पडून त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. या निधनानंतर रितेश अग्रवाल यांनी एक निवेदन जारी करून वडिलांच्या निधनाची माहिती दिली आहे. या घटनेमुळे रितेश अग्रवाल यांच्यावर दुखाचा […]
ADVERTISEMENT
Oyo founder ritesh agarwal father dies : ओयोचे फाऊंडर (Oyo Rooms) रितेश अग्रवाल यांचे वडील रमेश अग्रवाल (Ritesh Agarwal)यांचे निधन झाल्याची दु:खद घटना घडली आहे. गुरूग्रामच्या एका उचं इमारतीतून पडून त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. या निधनानंतर रितेश अग्रवाल यांनी एक निवेदन जारी करून वडिलांच्या निधनाची माहिती दिली आहे. या घटनेमुळे रितेश अग्रवाल यांच्यावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपुर्वीच त्यांच लग्न झालं होत. या लग्नानंतर ही दु: खद घटना घडलीय. (oyo founder ritesh agarwal father dies after falling from building gurugram)
ADVERTISEMENT
रितेश अग्रवाल (Ritesh Agarwal) गुरूग्राममधील DLF क्रिस्टा सोसायटी राहतात. या सोसायटीच्या 20 व्या मजल्यावर रितेश यांचे घर आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, रमेश अग्रवाल घराच्या बाल्कनीत उभे होते. यावेळी बाल्कनीतून कोसळून त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटने दरम्यान रितेश अग्रवाल आणि त्याची बायको घरीच होती. विशेष म्हणजे 7 मार्चला रितेश अग्रवाल गीतांशी सूदसोबत विवाहबंधनात अडकला होता. लग्नाच्या तीन दिवसानंतर कुटूंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
H3N2 Virus : भारतात H3N2 विषाणूचे 2 बळी, जाणून घ्या लक्षणे आणि उपचार
हे वाचलं का?
रितेश अग्रवालच्या निवेदनात काय?
जड अंतकरणाने मी आणि माझा परिवार सांगू इच्छीत आहे की, आमचे मार्गदर्शक आणि शक्ती,माझे वडिल रमेश अग्रवाल यांचे 10 मार्चला निधन झाले आहे. ते एक संपुर्ण आयुष्य जगले. त्यांना मला आणि माझ्यासारख्या अनेक लोकांना प्रेरीत केले आहे.त्यांचा मृत्यू आमच्यासाठी खुप मोठं नुकसान आहे. त्यांचे शब्द आमच्या हृद्यात खोलवर गुंजतात. मी सर्वांना विनंती करतो की या क्षणी त्यांनी आम्हाला साथ द्यावी
PM मोदींच्या सुरक्षा ताफ्यातील SPG कमांडोचा नाशिकमध्ये दुर्दैवी मृत्यू
ADVERTISEMENT
रितेश अग्रवालने (Ritesh Agarwal) 29 वर्षीय गीतांशा सूदसोबत 7 मार्चला लग्न केले होते. लग्नानंतर दिल्लीत त्यांनी एक ग्रँड रिसेप्शन पार्टी देखील दिली. या पार्टीला देश आणि जगभरातील अनेक मोठया व्यक्तींनी हजेरी लावली होती. रितेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील लग्नाचे आमंत्रण दिले होते. या संबंधित फोटो देखील व्हायरल झाले होते.
ADVERTISEMENT
प्रियकराकडून डॉक्टर प्रेयसीची हत्या, लव्ह जिहादचा आरोप… प्रकरण काय?
रितेश अग्रवाल (Ritesh Agarwal) हे देशातील सर्वांत तरूण उद्योजकांपैकी एक आहेत. 2013 ला त्यांनी ओयो रूम्सची (Oyo Rooms) सुरुवात केली होती. ओयो रूम्स जगातील सर्वात वेगवान हॉटेल चैन आहे. 35 हून जास्त देशातील 1.5 लाख हॉटेलमध्ये ओयो आपली सेवा पुरवते. ओयो नागरीकांना सर्वोत्तम सुविधेसह परवडणाऱ्या किंमतीत त्यांचे आवडते हॉटेल बूक करण्याची संधी देते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT