माढा: सरपंचावर रोखली पिस्तुल… वेळीच लॉक झाल्याने टळला अनर्थ!
नितीन शिंदे, माढा: डिझेल चोरीचा खोटा आरोप का केला? या कारणावरून माढा तालुक्यातील उपळाई (खुर्द) चे सरपंच संदीप पाटील यांच्यावर पिस्तुलमधून गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा माढा पोलिसात दाखल झाला आहे. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत माढा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी संदीप पाटील हे घरासमोर उभे असताना प्रमोद […]
ADVERTISEMENT
नितीन शिंदे, माढा: डिझेल चोरीचा खोटा आरोप का केला? या कारणावरून माढा तालुक्यातील उपळाई (खुर्द) चे सरपंच संदीप पाटील यांच्यावर पिस्तुलमधून गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा माढा पोलिसात दाखल झाला आहे. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
याबाबत माढा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी संदीप पाटील हे घरासमोर उभे असताना प्रमोद जाधव, विनोद जाधव, सुवर्णा जाधव, कौशल्या जाधव व आनंद बारबोले, तनुजा बारबोले यांनी फिर्यादी संदीप पाटील यांना तुम्ही प्रमोदवर डिझेल चोरीचा खोटा आरोप का केला? असा सवाल विचारत त्यांना थेट शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
त्यावेळी संदीप पाटील यांच्या भावकीतील किरण पाटील व समाधान पाटील यांनी आरोपींना उद्देशून तुम्ही संदीप पाटील यांना शिवीगाळ का करता? अशी विचारणा केली. त्यावेळी महिलांनी हाताने व लाथा-बुक्क्यांनी तर प्रमोद जाधव याने त्याच्या हातातील लाकडी दांडक्याने संदीप पाटील यांच्या भावकीतील लोकांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
हे वाचलं का?
हा सगळा प्रकार पाहून संदीप पाटील हे तेथील भांडण सोडविण्यासाठी पुढे गेले. त्याचवेळी विनोद जाधव हा सरपंच संदीप पाटील यांच्या अंगावर धावून गेला तर आनंद बारबोले याने त्याच्या जवळील पिस्तुल काढून संदीप पाटील यांच्या दिशेने जीवे मारण्याच्या उद्देशाने रोखले.
‘तुला खल्लासच करतो असं म्हणत आनंद बारबोले याने संदीप संदीप पाटील यांच्यावर गोळी झा़डण्याचा प्रयत्न केला. पण वेळीच बंदूक लॉक झाल्याने पुढील अनर्थ टळला. पण या प्रकरणी सर्वांना अटक करण्यात आली असून या घटनेचा तपास करण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव व उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल हिरे यांनी घटनास्थळी भेट दिली. या संपूर्ण गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शाम बुवा हे करत आहेत.
ADVERTISEMENT
घरी जाताना वाटेतच करण्यात आला गोळीबार; कामगाराचा मृत्यू, सराफा व्यापारी जखमी
ADVERTISEMENT
आता या प्रकरणी आरोपींना कठोर शासन व्हावं अशी मागणी सरपंच संदीप पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. या संपूर्ण घटनेमुळे गावात मात्र, तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता पोलिसांकडून आरोपींवर नेमकी काय कारवाई केली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT