पंढरपुरात पोलिसांनी रोखले दोन बाल विवाह

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

एकीकडे केंद्र सरकार  मुलींच्या लग्नाचे वय अठरा ऐवजी 21 करण्याचा कायदा आणण्याच्या प्रयत्नात आहे. परंतू दुसरीकडे ग्रामीण भागात अजूनही मुलीस १८ वर्षे पूर्ण होण्याअगोदरच लग्न लावून देण्याची गडबड केली जात असल्याचा घटना समोर येत आहेत. असेच दोन बालविवाह पंढरपूर पोलिसांना रोखण्यात यश आले आहे.

ADVERTISEMENT

पंढरपुर तालुक्यातील आजोती व तिसंगी या दोन गावांत होणारे अल्पवयीन मुलींचे विवाह तालुका आणि ग्रामीण पोलिसांना रोखण्यात यश आले. माढा तालुक्यातील कण्हेरगाव येथील एका १३ वर्षीय मुलीचा पंढरपुर तालुक्यातील आजोती येथील युवकाशी तर अकलूज येथील १५ वर्षीय मुलीचा बालविवाह तिसंगी येथील युवकाशी होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने आजोती येथे जाऊन अल्पवयीन मुलीचा होणारा बालविवाह त्यापूर्वीच थांबवला व मुलीच्या पालकांचे समुपदेशन केले.

Mumbai Crime : अल्पवयीन मुलीसोबत लग्न करुन बलात्कार, आरोपी पतीला अटक

हे वाचलं का?

पोलिसांनी या घटनेतील दोन्ही अल्पवयीन मुलींना सोलापूर येथील महिला व बालकल्याण समितीसमोर हजर केले. यावेळी संबंधित अल्पवयीन मुलींसोबत त्यांच्या पालकांचंही समुपदेशन करुन त्यांना कायद्याची योग्य माहिती देण्यात आली आहे.

क्रूरतेचा कळस! अल्पवयीन मुलीवर महिलेनं पतीला नजरेसमोर करायला लावला बलात्कार

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT