ST कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र थांबेना, पंढरपुरात आणखी एका कर्मचाऱ्याने संपवलं आयुष्य
राज्यात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र काहीकेल्या थांबताना दिसत नाहीये. पंढरपूर आगारात सहाय्यक मेकॅनिक म्हणून कार्यरत असलेल्या दथरथ गिड्डे यांनी राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. बुधवारी सकाळी राहत्या घरी गिड्डे यांनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं. आर्थिक विवंचनेून गिड्डे यांनी हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आधीच तुटपुंजा पगार […]
ADVERTISEMENT
राज्यात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र काहीकेल्या थांबताना दिसत नाहीये. पंढरपूर आगारात सहाय्यक मेकॅनिक म्हणून कार्यरत असलेल्या दथरथ गिड्डे यांनी राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
ADVERTISEMENT
बुधवारी सकाळी राहत्या घरी गिड्डे यांनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं.
आर्थिक विवंचनेून गिड्डे यांनी हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आधीच तुटपुंजा पगार आणि तो पगारही वेळेत मिळत नसल्यामुळे गिड्डे काही दिवसांपासून आर्थिक अडचणीत होते. यातूनच त्यांनी हे पाऊल उचलल्याचा आरोप स्थानिक कर्मचाऱ्यांनी केला आहे.
हे वाचलं का?
बीड : आर्थिक विवंचनेतून एसटी बस चालकाची आत्महत्या
दरम्यान पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून गिड्डे यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. गिड्डे यांच्या पश्चात आई-वडिल, पत्नी आणि दोन लहान मुलं आहेत. एसटी महामंडळावर कर्जाचा वाढता डोंगर आणि त्यात अनेक कर्मचाऱ्यांना पगार वेळेत मिळत नसल्यामुळे कर्मचारी विवंचनेत आहेत. काही दिवसांपूर्वीच बीडमध्ये एका एसटी चालकाने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं होतं.
ADVERTISEMENT
कर्जाचं ओझं! एसटीचालकाने बसमध्येच घेतला गळफास; अहमदनगरमधील धक्कादायक घटना
ADVERTISEMENT
२६ फेब्रुवारी २०२१ रोजी नांदेडच्या माहूर आगारातील कर्मचाऱ्याने आत्महत्या केली होती. यानंतर राज्यात सुरु झालेलं आत्महत्यांचं सत्र काहीकेल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT