Parambir Sing यांच्या सहकाऱ्याने वर्तवलं होतं भाकित, ‘CBI राज्यात येणार एका मंत्र्यांची विकेट जाणार’

दिव्येश सिंह

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मार्च महिन्यात जो लेटरबॉम्ब टाकला त्यामध्ये त्यांनी दोन गंभीर आरोप त्यावेळी महाराष्ट्राचे गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुख यांच्यावर केले होते. पहिला आरोप होता तो म्हणजे सचिन वाझेला दर महिन्याला बार आणि रेस्तराँमधून 100 कोटी रूपयांच्या वसुलीचं टार्गेट देण्यात आलं होतं. दुसरा आरोप होता की पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये अनिल देशमुख हे ढवळाढवळ करतात. या आरोपानंतर काय झालं ते आपल्याला माहित आहेच. एप्रिलमध्ये हे प्रकरण हायकोर्टात गेलं. हायकोर्टाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले आणि त्यानंतर अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. आता या प्रकरणात एक नवी माहिती समोर आली आहे. ती अशी की परमबीर सिंग यांचे जवळचे सहकारी असलेल्या एका अधिकाऱ्याने हे भाकित वर्तवलं होतं की सीबीआय महाराष्ट्रात येणार आणि एका मंत्र्यांची विकेट पडणार.

हे भाकित दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर संजय पुनामियाने वर्तवलं होतं. बरोबर संजय पुनामिया हा तोच व्यक्ती आहे जो परमबीर सिंग यांचा निकटवर्तीय आहे. काही दिवसांपूर्वीच बिल्डर श्यामसुंदर अग्रवालने परमबीर सिंग यांच्याविरोधात खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे. तसंच या प्रकरणी तक्रारही दाखल केली आहे. याच व्यक्तीने आता पोलिसांना असं सांगितलं आहे की मार्च महिन्यात संजय पुनामिया आणि परमबीर सिंग यांच्यात एक चर्चा झाली होती ती मी ऐकली होती. त्या चर्चेचा संदर्भ असा होता की महाराष्ट्रात राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच NIA येईल CBI येईल आणि चार पाच मंत्र्यांची चौकशी केली जाईल. तसंच एका मंत्र्यांची विकेट पडेल. सरकार अस्थिर होईल आणि पडेल. एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. गुरूवारी संजय पुनामिया आणि त्याच्या एका सहकाऱ्याला अटकही करण्यात आली आहे. संजय पुनामिया हा व्यावसायिक परमबीर सिंग यांच्या जवळचा मानला जातो.

काय म्हटलं आहे श्यामसुंदर अग्रवालने?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

संजय आणि माझ्यामध्ये तणाव निर्माण झाला होता. श्याम सुंदर अग्रवाल आणि संजय पुनामिया हे एके ठिकाणी भेटले होते त्यावेळी मी आमचे दोघांचेही संभाषण रेकॉर्ड केले होते. या वर्षीच्या मार्च महिन्यातली ही घटना आहे. पुनामिया आणि मी आमच्यात सेटलमेंट व्हावी म्हणून भेटलो होतो. त्यावेळी आम्ही एकमेकांशी जवळपास साडेतीन तास बोलत होतो. माझ्याकडे ते पूर्ण रेकॉर्डिंग आहे. त्याच जोरावर मी परमबीर सिंग आणि इतरांच्या विरोधात FIR केली आहे. पुनामियाने त्यावेळी मला असं सांगितलं की एका केंद्रीय मंत्र्यांना मला एक काम दिलं आहे. ते काम असं की महाराष्ट्रातल्या एका मंत्र्याची विकेट काढायची. ज्यानंतर केंद्राच्या तपास यंत्रणा राज्यात येतील.

श्यामसुंदर अग्रवालच्या वकिलाने दोन पेनड्राईव्ह पोलिसांना दिले आहेत. त्यापैकी एकामध्ये तीन तासाचं आणि एका मध्ये दोन तासाचं व्हॉईस रेकॉर्डिंग आहे. मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात हे पेन ड्राईव्ह जमा करण्यात आले आहेत.

ADVERTISEMENT

अग्रवाल म्हणतो, 23 मार्चला मी आणि पुनामिया भेटलो होतो. त्यानंतर आम्ही 30 मार्चला भेटलो या दोन्ही दिवशी रेकॉर्डिंग करण्यात आलं आहे. आमची मिटिंग सुरू असताना पुनामियाला परमबीर सिंग, डीसीपी अकबर पठाण आणि इतर अधिकाऱ्यांचे फोन आले होते. त्यावेळी संजय पुनामियाने १०० कोटींच्या खंडणीचा विषय आणि त्या अनुषंगाने परमबीर सिंग यांनी लिहिलेलं पत्र हा विषय काढला होता. त्यावेळी पुनामिया हेदेखील म्हणाला होता की लवकरच या प्रकरणाची सीबीआय चौकशी केली जाईल. एवढंच नाही तर यानंतर पुनामिया असंही म्हणाला होता की NIA पण राज्यात येईल आणि चार ते पाच मंत्र्यांची चौकशी करेल आणि मग त्यांनाही त्यांच पद सोडावं लागेल. ज्यामुळे हे सरकार अडचणीत येईल. संजय पुनामियाने त्या दिवशी एका अत्यंत वरिष्ठ नेत्याचं नाव घेतलं होतं असंही अग्रवाल यांनी सांगितलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT