अखेर चर्चांवर शिक्कामोर्तब! परिणीती चौप्रा राघव चढ्ढा ‘या’ दिवशी होणार Engage
Parineeti chopra Raghav Chadha Engagement :परिणीती चौप्रा आणि राघव चढ्ढा एप्रिल महिन्यात एंगेजमेंट करणार असल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीमध्ये ही एंगेजमेंट होणार असल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे आता त्यांच्या एंगेजमेंटची नेमकी तारीख कोणती असणार आहे? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ADVERTISEMENT
Parineeti chopra Raghav Chadha Engagement : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti chopra) आणि राघव चढ्ढा (Raghav Chadha) गेल्या अनेक दिवसांपासून कॅमेरात एकत्र स्पॉट झाले आहेत. त्यामुळे ते एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र आता त्याहून मोठी बातमी समोर आली आहे. परिणीती चौप्रा आणि राघव चढ्ढा एप्रिल महिन्यात एंगेजमेंट करणार असल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीमध्ये ही एंगेजमेंट होणार असल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे आता त्यांच्या एंगेजमेंटची नेमकी तारीख कोणती असणार आहे? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (parineeti choupra raghav chadha will be engaged on this day)
ADVERTISEMENT
या तारखेला होणार एंगेजमेंट
परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांची एप्रिल महिन्यात एंगेजमेंट होणार आहे. दिल्लीत फक्त नातेवाईकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठीच प्रियंका चोपडा निक जोनस आणि मालती मॅरीला घेऊन भारतात आल्याची माहिती आहे.तसेच प्रियंकाने परिणीतीच्याच एंगेजमेंटच्याच वेळीस भारतातील ट्रिप प्लान केली आहे. यासोबत तिची चुलत बहिण मीरा कपूर देखील दिल्लीत आहे. त्यामुळे दोघांच्या एंगेजमेंटच्या चर्चाना आणखीण वेग मिळत आहे.
हे ही वाचा : ‘मुलीला न्याय द्या’,’नाही तर मीही बरं वाईट करून घेईन’, आकांक्षा दुबेच्या आईचा इशारा
परिणीती चोप्राने नुकताच मिरर सेल्फी सोशल मीड़ियावर शेअर केला होता. या फोटोवर तिने चश्मीश असे कॅप्शन दिले होते. आणि नेटकऱ्यांनी हे नाव राघवने दिल्याचे कमेंट केले. तसेच ”चढ्ढा जी को पसंद आयेगा आपका ये चष्मा” असे कमेंट देखील नेटकऱ्यांनी केले आहे.या तिच्या फोटोची सोशल मीडियावर चर्चा आहे.
हे वाचलं का?
खासदाराच्या शुभेच्छा
आपचे खासदार संजीव अरोरा (Sanjeev Arora) यांनी ट्विट करून दोघांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या ट्विटनंतर राघव चढ्ढा आणि परिणीत चोप्राचं लग्न जमल्याची चर्चा सुरु झाली आहे.परिणीती चोप्रा (Parineeti chopra) आणि राघव चढ्ढा (Raghav Chadha) या दोघांचा फोटो संजीव अरोरा यांनी ट्विट केला होता. या फोटोला राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्राला हार्दीक शुभेच्छा देतो, असे कॅप्शन लिहत, मी आशा करतो की दोघांच आयुष्य प्रेम आणि आनंदाने भरून असाव. माझ्या हार्दीक शुभेच्छा असे ट्विट संजीव अरोरा यांनी केले आहे.
Bollywood: ‘बॉलिवूडमध्ये सापापेक्षाही विषारी गँगस्टर्स’, प्रियांकानंतर शेखर सुमनचे खळबळजनक आरोप
ब्रिटनमध्ये एकत्र शिक्षण
राघव चढ्ढा (Raghav Chadha) आणि परिणीती चोप्रा (Parineeti chopra)बद्दल बोलायचं झालं तर दोघांनीही ब्रिटेनमध्ये शिक्षण घेतले आहे. ब्रिटनमधलं शिक्षण पुर्ण झाल्यानंतर परिणीती चोप्राने बॉलिवूडमध्ये करिअर केलं.ती आता बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. तर राघव चढ्ढा यांनी राजकारणाला करिअर म्हणून निवडलं. राघव आम आदमी पक्षाचे खासदार आहेत. दरम्यान राघव चढ्ढा (Raghav Chadha) आणि परिणीती चोप्रा Parineeti chopra)यांच्या नात्याची चर्चा सुरु असताना संजीव अरोरा यांनी ट्विट करून शुभेच्छा दिल्यानंतर त्यांच लग्न जमल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.मात्र दोघांनीही अद्याप यावर अधिकृतपणे घोषणा केली नाही. त्यामुळे ही निव्वळ चर्चा असल्याचे बोलले जात आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT