महत्त्वाची बातमी! कोरोनातून बरे झालेले रुग्ण Insurance साठी नसतील पात्र!
मुंबई: एकीकडे कोरोनाचं (Corona) संकट काही केल्या संपत नसताना दुसरीकडे याचबाबत आणखी काही अशा बातम्या समोर येत आहे की ज्याचा थेट तुम्हा-आम्हाला गंभीर फटका बसू शकतो. आता देखील एक अशीच बातमी समोर आली आहे जी आपल्यावर बराच परिणाम करु शकते. जर आपण नुकतेच कोव्हिड-19 या आजारातून बरे झाला असाल आणि आपल्याला जर जीवन किंवा आरोग्य […]
ADVERTISEMENT
मुंबई: एकीकडे कोरोनाचं (Corona) संकट काही केल्या संपत नसताना दुसरीकडे याचबाबत आणखी काही अशा बातम्या समोर येत आहे की ज्याचा थेट तुम्हा-आम्हाला गंभीर फटका बसू शकतो. आता देखील एक अशीच बातमी समोर आली आहे जी आपल्यावर बराच परिणाम करु शकते. जर आपण नुकतेच कोव्हिड-19 या आजारातून बरे झाला असाल आणि आपल्याला जर जीवन किंवा आरोग्य विमा पॉलिसी (Insurance) खरेदी करायची असेल तर आपल्याला हा विमा मिळणार नाही.
ADVERTISEMENT
जीवन आणि आरोग्य विमा कंपन्या (Life or Health Insurance Policy) या आता कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांसाठी कठोर निकष अवलंबणार आहेत. यामुळे जे कोरोना रुग्ण बरे झाले आहेत आणि ते जर आता विमा काढू इच्छित असतील तर अशी लोकं हे तूर्तास तरी पात्र नसतील. कारण अशा लोकांना आपला अर्ज मान्य होण्यासाठी जवळजवळ सहा महिन्यांपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते.
अमरावतीतल्या कोरोना रूग्णवाढीमागे विमा कंपन्या-दवाखान्यांचं रॅकेट?
हे वाचलं का?
“विमा कंपन्यांना या कोव्हिड-19 च्या दीर्घकालीन परिणामांची नेमकी खात्री नाही. त्यामुळे वेगवेगळ्या विमा कंपन्या या नुकतंच कोरोनातून बरे झालेल्या लोकांबाबत वेगवेगळ्या भूमिका घेत आहेत. काही कंपन्यांचा कूल-ऑफ पीरियड तीन महिन्यांचा असतो, तर काहींचा सहा महिन्यांचा किंवा काहींचा कूल-ऑफ पीरियड नसतो. हे विमा कंपनीच्या अंडरराइटिंग मार्गदर्शक तत्त्वांवर अवलंबून असते.’ अशी माहिती पॉलिसी बजार डॉट कॉमचे प्रमुख अमित छाब्रा यांनी दिली आहे.
विमा धारकाला कोव्हिड-19 बाबत स्पष्ट व प्रामाणिक राहावं लागणार आहे. कारण त्यांना आवश्यक कागदपत्र जसं की, डिस्चार्ज कार्ड (जर, रुग्णालयात भरती असेल तर) तसेच कोव्हिड-19 निगेटिव्ह रिपोर्ट यासारखी कागदपत्रं जमा करावी लागणार आहेत.
ADVERTISEMENT
आपण प्रस्ताव फॉर्म भरल्यानंतर गरज भासल्यास अंडररायटिंग टीम आपल्याकडे अधिक तपशील घेण्यासाठी येऊ शकते. आपल्या आरोग्याच्या नोंदीच्या आधारे विमा कंपन्या या आपला प्रस्ताव अर्ज स्वीकारायचा, नाकारायचा किंवा पुढे ढकल्याचा याबाबत निर्णय घेत असतात. काही वेळेस तर, कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांना वैद्यकीय चाचण्यादेखील द्याव्या लागू शकतात.
ADVERTISEMENT
एकीकडे कोरोनासारखा जीवघेणा आजारामुळे सर्वांचाच डोक्यावर एक प्रकारची टांगती तलवार आहे. अशावेळी विमा असणं आणि त्यातही आरोग्य विमा असणं हे अत्यंत आवश्यक आहे. पण अशा अडचणीच्या वेळी जर विमा कंपन्या आडमुठी भूमिका घेणार असतील तर त्यामुळे अनेकांना नाहक त्रास होण्याची अधिक शक्यता आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT