Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेल दरवाढीचे चटके; १३ दिवसांत पेट्रोल ८ रुपयांनी महागलं

मुंबई तक

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वसामान्यांना पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेल दरवाढीचे चटके बसू लागले आहेत. २२ मार्चपासून सुरू झालेली पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरूच असून, पेट्रोलबरोबर डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. आज पेट्रोल-डिझेलच्या दरात ८० पैशांची वाढ करण्यात आली असून, गेल्या १३ दिवसांच्या कालावधीत पेट्रोल तब्बल ८ रुपयांनी महाग झालं आहे. देशातील पेट्रोल-डिझेलचे दर वेगाने वाढू […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वसामान्यांना पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेल दरवाढीचे चटके बसू लागले आहेत. २२ मार्चपासून सुरू झालेली पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरूच असून, पेट्रोलबरोबर डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. आज पेट्रोल-डिझेलच्या दरात ८० पैशांची वाढ करण्यात आली असून, गेल्या १३ दिवसांच्या कालावधीत पेट्रोल तब्बल ८ रुपयांनी महाग झालं आहे.

देशातील पेट्रोल-डिझेलचे दर वेगाने वाढू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर तेल वितरक कंपन्यांनी २२ मार्चपासून दरवाढ सुरू केली. मागील १३ दिवसांत बहुतांश वेळा पेट्रोल-डिझेलच्या दरात लिटरमागे ८० पैशांची वाढ करण्यात आली. त्यामुळे दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दराच्या झळा सर्वासामान्यांना सोसाव्या लागत आहेत.

भारतीय तेल वितरक कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या ताज्या माहितीनुसार पेट्रोल-डिझेलचे दर प्रति लीटर ८० पैशांनी वाढले आहेत. त्यामुळे देशातील प्रमुख शहरातील पेट्रोलचे दर शंभरी पलिकडे गेले आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी ११८.४२ रुपये मोजावे लागत आहेत. त्याचबरोबर डिझेलही दरही लिटरमागे १०२.६४ रुपयांवर जाऊन पोहोचले आहेत.

इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या माहितीप्रमाणे राजस्थानातील श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल प्रति लीटर १२०.९६ रुपयांवर म्हणजे १२१ रुपयांवर जाऊन पोहोचलं आहे. तर डिझेलचे दर १०३.५१ रुपये प्रति लिटरवर गेले आहेत. राजधानी दिल्लीतही पेट्रोलचे दर प्रति लीटर १०३.४१ रुपये, तर डिझेल प्रति लीटर ९४.६७ रुपये दरांनी विकलं जात आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp