मुंबईत पेट्रोल लवकरच सेंच्युरी मारण्याच्या तयारीत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सातत्याने होणारी वाढ सामान्य जनतेसाठी चिंतेचा विषय बनला आहे. देशात आणि राज्यातील काही भागांमध्ये पेट्रोलच्या दरांनी शंभरीचा आकडा पार केला आहे, तर मुंबईत पेट्रोल लवकरच सेंच्युरी मारण्याच्या तयारीत आहे. मुंबईत सध्या पॉवर पेट्रोलचे दर हे ९९ रुपये ४३ पैसे, साधं पेट्रोल हे ९५ तर डिझेलचे दर ८६ रुपयांपर्यंत पोहचले आहेत.

ADVERTISEMENT

गेल्या ९ दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत असल्यामुळे सामान्य जनतेचं कंबरडं मोडलं आहे. मुंबईत गोरेगाव भागात पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या एका ग्राहकाशी आमच्या प्रतिनिधींनी त्याची प्रतिक्रीया विचारली असता ग्राहकाने आपली उद्विग्न प्रतिक्रीया दिली. “आता यामध्ये काहीच बदल होणार नाहीये, त्यामुळे आम्हाला कसं वाटतं हा प्रश्न विचारुन काय फायदा?? आम्ही आतापर्यंत त्रास भोगत आलोय आणि यापुढेही असाच त्रास आम्हाला होणार आहे याची आम्ही तयारी ठेवली आहे”.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सामान्य लोकांना लोकल प्रवासाची परवानगी दिली आहे. परंतू या प्रवासासाठीही वेळेची मर्यादा असल्यामुळे अनेक लोकं आजही आपल्या खासगी वाहनाने ऑफिसला ये-जा करतायत. अशा परिस्थितीत पेट्रोल आणि डिझेलचे वाढलेले दर सामान्य मुंबईकरांच्या खिशाला कात्री लावत आहेत.

हे वाचलं का?

हा व्हिडिओ देखील पहा..

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT