माझ्या नादी लागाल तर करेन ३०२; इन्स्टाग्रामवर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ, ‘थेरगाव क्विन’ अटकेत
इन्स्टाग्राम रिलच्या माध्यमातून अर्वाच्च आणि अश्लिल भाषेत शिवीगाळ करणाऱ्या थेरगाव क्विनला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. थेरगाव क्विन हे अकाऊंट चालवणाऱ्या साक्षी हेमंत श्रीमल आणि तिची सहकारी साक्षी कश्यप व कुणाल कांबळे यांच्याविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोण कुठला डॉन माझ्या नादी लागाल तर करेन ३०२..अशा अशायाचे अनेक व्हिडीओ साक्षी श्रीमल […]
ADVERTISEMENT
इन्स्टाग्राम रिलच्या माध्यमातून अर्वाच्च आणि अश्लिल भाषेत शिवीगाळ करणाऱ्या थेरगाव क्विनला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. थेरगाव क्विन हे अकाऊंट चालवणाऱ्या साक्षी हेमंत श्रीमल आणि तिची सहकारी साक्षी कश्यप व कुणाल कांबळे यांच्याविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
कोण कुठला डॉन माझ्या नादी लागाल तर करेन ३०२..अशा अशायाचे अनेक व्हिडीओ साक्षी श्रीमल आपल्या थेरगाव क्विन या अकाऊंटवर पोस्ट करायची. अनेक व्हिडीओमध्ये अश्लिल शिवीगाळ, दहशत माजवण्याचा प्रयत्न, धमकी, मुलींना बलात्काराची धकमी असे गंभीर आरोप या आरोपींवर ठेवण्यात आले आहेत.
पोलिसांनी या अकाऊंटवर तात्काळ कारवाई करत ते बंद करण्याची प्रक्रीया सुरु केली आहे. थेरगाव क्विन या नावाने सोशल मीडियावर फेमस झालेल्या साक्षी श्रीमलच्या व्हिडीओला चांगले फॉलोअर्स मिळू लागले. परंतू व्हिडीओतून दहशत माजवणं, अश्लील शिवीगाळ करणं आणि धमकी देणं या आरोपाखाली पोलिसींनी साक्षी श्रीमल आणि तिची साथीदार साक्षी कश्यपला अटक केली आहे. तिचा साथीदार कुणाल कांबळे अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
हे वाचलं का?
पोलिसांचा मुळशी पॅटर्न ! दहशत माजवणाऱ्या आरोपींचं मुंडन करुन काढली धिंड
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT