पुणे : ‘आज जेल, कल बेल, परसो वही खेल’ म्हणणाऱ्या ‘तलवार भाई’ला पिंपरी चिंचवड पोलिसांनी घडवली अद्दल

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

समीर शेख

पिंपरी चिंचवड

आज जेल, कल बेल, परसो वही खेल, असं म्हणत दहशत पसरवणारा रिल बनवणाऱ्या तथाकथित तलवार भाईला पिंपरी चिंचवड पोलिसांनी अद्दल घडवली आहे. व्हिडिओत त्याने केलेल्या जुन्या गून्ह्याच्या बातमीचे कात्रण जोडून दहशत निर्माण व्हावी या उद्देशाने त्याने व्हिडिओ व्हायरल केला होता. २३ वर्षांचा ऋषिकेश उर्फ मोन्या वाघिरे असं त्याचं नाव आहे. पोलिसांनी त्याला चांगलीच अद्दल घडवत बेड्या ठोकल्या आहेत. यापूर्वी देखील त्याच्याकडे विना परवान्याची पिस्तूल सापडली होती. त्या दरम्यान देखील गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला अटक केली होती. मात्र असं असून सुद्धा त्याने पुन्हा तलवार घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसाच्या शस्त्र प्रतिबंधक पथकाने गुन्हा दाखल करत त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

व्हिडिओच्या माध्यमाने आपली दहशत पसरवणाऱ्या मोन्या वाघीरे हा वाकडच्या कस्पटे वस्तीत राहतो. काही महिन्यापूर्वी याच पोलिस पथकाने त्याला विना परवाना पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक केली होती. तशी बातमी देखील काही वृत्तपत्रात छापून आली होती. त्याच जुन्या गुन्ह्याच्या बातमीचे कात्रण व्हिडिओत जोडून त्याने दहशत पसरवणारा व्हिडिओ बनवला. त्यावर ‘आज जेल, कल बेल, परसो वही खेल’ असा मजकूर देखील लिहला. याची पोलिसांना माहिती मिळताच त्याला वाकड भागातून पोलिसांनी ताब्यात घेतले. या दरम्यान देखील तो हातात तलवार घेऊन परिसरात दहशत पसरवत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

याप्रकरणी ऋषिकेश वाघिरे याच्याकडून तलवार जप्त करत त्याच्या विरोधात पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी बोलताना शस्त्र प्रतिबंधक पथकाचे अधिकारी राजेंद्र निकाळजे म्हणाले की, अशा व्हिडीओज आणि स्टेट्समुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण होते. तसेच अल्पवयीन मुलं गुन्हेगारीकडे आकर्षित होतात. यावर प्रतिबंध आणण्यासाठी आम्ही विशेष अभियान चालवत आहोत, असं निकाळजे म्हणाले.

ADVERTISEMENT

सोशल मीडियाचा चांगल्यासाठी वापर करण्यापेक्षा चुकीच्या पद्धतीने वापर करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. सद्या रिल्स, व्हिडिओ या माध्यमाने समाजात तेढ निर्माण करणे, दहशत पसरवने, असे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे अशा वापरकर्त्यांवर पोलिस बारीक नजर ठेऊन आहेत. यापूर्वी देखील Instagram रीलमध्ये सतत अश्लील शिवीगाळ करणाऱ्या थेरगावच्या क्वीनला पोलिसांनी अटक केली होती. मात्र तिने देखील जामीनीवर सुटल्यानंतर पुन्हा पहिले पाढे पंचावन्न केले. जामिनावर सुटल्यानंतर तिचं मोठ्या थाटात स्वागत करण्यात आले. त्यामुळे अशे व्हिडिओ बनवणाऱ्याना आणखी प्रोत्साहन मिळतो. आता या जेलवारीनंतर दहशत पसवणाऱ्या या मोण्या वाघिरेला अद्दल घडते का, हे पहावं लागेल.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT