PM Modi Cabinet Expansion 2021: मोदींकडून धक्कातंत्राचा वापर, खातेवाटप जाहीर; पाहा संपूर्ण यादी
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करताना ज्या पद्धतीने धक्कातंत्राचा वापर केला. तसाच काहीसा प्रकार आता मोदींनी खाते वाटपात देखील केला आहे. दरम्यान, या खाते वाटपादरम्यान पंतप्रधान मोदींनी मोठ्या प्रमाणात फेरबदल केले आहेत. यामधील सर्वात मोठा बदल म्हणजे पियुष गोयल यांच्याकडे असणारे रेल्वे मंत्रालय हे अश्विनी वैष्णव यांच्याकडे देण्यात आलं आहे. त्यामुळे […]
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करताना ज्या पद्धतीने धक्कातंत्राचा वापर केला. तसाच काहीसा प्रकार आता मोदींनी खाते वाटपात देखील केला आहे. दरम्यान, या खाते वाटपादरम्यान पंतप्रधान मोदींनी मोठ्या प्रमाणात फेरबदल केले आहेत.
यामधील सर्वात मोठा बदल म्हणजे पियुष गोयल यांच्याकडे असणारे रेल्वे मंत्रालय हे अश्विनी वैष्णव यांच्याकडे देण्यात आलं आहे. त्यामुळे हे एकप्रकारे पियुष गोयल यांचं डिमोशनचं म्हटलं जात आहे. दुसरीकडे स्मृती इराणी यांच्याकडे असणारं वस्त्रोद्योग खातं हे आता पियुष गोयल यांच्याकडे देण्यात आलं आहे. त्यामुळे स्मृती इराणी यांच्याकडे आता फक्त महिला व बालविकास मंत्रालयाची जबाबदारी असणार आहे.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नव्यानेच तयार करण्यात आलेल्या सहकार मंत्रालयाची जबाबदारी ही अमित शाह यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. तर राज्यमंत्रि पदावरुन कॅबिनेटपदी मंत्री मिळालेल्या अनुराग ठाकूर यांना देखील मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांना माहिती व प्रसारण मंत्री आणि युवा व क्रीडा मंत्रालय देण्यात आलं आहे.
याशिवाय महाराष्ट्रातून जे चार मंत्री गेले आहेत त्यापैकी नारायण राणे यांना सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री (कॅबिनेट), भागवत कराड यांना अर्थ (राज्यमंत्री), भारती पवार यांना आरोग्य (राज्यमंत्री) आणि कपिल पाटील यांना पंचायत राज (राज्यमंत्री) ही खाती देण्यात आली आहेत.