आई हिराबेन मोदींबद्दल सांगताना मोदी झाले होते हळवे; वाचा ‘तो’ ब्लॉग

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं आज (30 डिसेंबर) पहाटे दुख:द निधन झालं. हिराबेन यांचं वय १०० वर्ष होतं. त्यांनी अहमदाबादमधल्या यूएन मेहता रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. १८ जून २०२२ रोजी हीराबेन यांनी वयाची शंभरी पूर्ण केली होती. त्यानिमित्ताने नरेंद्र मोदी यांनी आईबद्दलच्या भावना ब्लॉगमधून व्यक्त केल्या होत्या.

हिराबेन मोदी यांच्या १००व्या वाढदिवशी पंतप्रधान मोदींनी त्यांचे पाय धुतले होते. तसेच आईचा आशीर्वाद घेतला. फोटो शेअर करत पंतप्रधानांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या. ‘आज माझी आई १००व्या वर्षात पदार्पण करत आहे. यावेळी तिचे आशीर्वाद घेतले.’ पंतप्रधानांनी ‘narendramodi.in’ वर ‘माँ’ या मथळ्याने हा ब्लॉग लिहिला होता. त्यात त्यांनी आईचे त्यांच्या जीवनात, त्यांना घडवण्यात काय महत्त्व आहे, याबद्दल सांगितलं होतं.

Heeraben Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींना मातृशोक, हिराबेन यांचं निधन

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हिराबेन मोदी : ‘माँ’ ब्लॉगमध्ये मोदींनी काय म्हटलेलं?

“आई, हा फक्त एक शब्द नाही. ही जीवनाची भावना आहे ज्यामध्ये आपुलकी, संयम, विश्वास हे सर्व काही सामावलेलं आहे. जगाचा कोणताही कोपरा असो प्रत्येक मुलाच्या हृदयातील सर्वात अनमोल प्रेम हे त्यांच्या आईसाठी आहे. आई, फक्त आपल्या शरीराला घडवत नाही तर आपले मन, आपले व्यक्तिमत्व, आपला आत्मविश्वास देखील घडवते आणि आपल्या मुलांसाठी हे करत असताना ती स्वतःला विसरते. आज मला माझा आनंद, माझं सौभाग्य तुम्हा सर्वांना सांगायचे आहे. माझी आई हिराबा आज १८ जून २०२२ रोजी शंभरव्या वर्षात पदार्पण करत आहे. म्हणजे तिचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. वडील हयात असते तर तेही गेल्या आठवड्यात १०० वर्षांचे झाले असते. म्हणजे २०२२ हे असे वर्ष आहे जेव्हा माझ्या आईचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे आणि या वर्षी माझ्या वडिलांचे जन्मशताब्दी वर्ष पूर्ण होत आहे.”

मोदी पुढे लिहितात, “माझ्या आईचा जन्म मेहसाणा जिल्ह्यातील विसनगर येथे झाला. वडनगरपासून हे गाव फार दूर नाही. माझ्या आईला तिच्या आईचे म्हणजेच माझ्या आजीचे प्रेम मिळाले नाही. १०० वर्षांपूर्वी आलेल्या जागतिक महामारीचे परिणाम अनेक वर्षे राहिले. याच माहामारीत माझ्या आईपासून माझी आजीही हिरावून घेतली. तेव्हा आई अवघ्या काही दिवसांची असावी. माझ्या आईचं बालपण तिच्या आईशिवाय गेलं. तिला आईजवळ हट्ट करता आला नाही. आईच्या कुशीत शिरता आलं नाही. आईला शिकता आलं नाही. आईने शाळेचा दरवाजाही बघितला नाही. तिला बघायला मिळालं फक्त गरिबी आणि उणीव दिसली.”

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT