‘…तर तुम्ही त्याला घराणेशाही म्हणून शकता’; नरेंद्र मोदींवर अजित पवारांचा पलटवार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७५व्या स्वातंत्र्य दिनी लालकिल्ल्यावरून देशाला संबोधित केलं. विविध मुद्द्यांचा उहापोह करताना नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचार आणि घराणेशाहीचाही उल्लेख आणि विरोधकांवर टीकास्त्र डागलं. मोदींनी केलेल्या टीकेला आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उत्तर दिलंय. अजित पवारांनी थेट नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची नावं घेत पलटवार केलाय.

ADVERTISEMENT

मुंबईत माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, “आपल्याकडे लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये घराणेशाही कुणीही आणू शकत नाही. लोकशाहीमध्ये जर जनतेनं त्यांना निवडून दिलं तर ते निवडून येऊ शकतात. जर कुणाचं काम चांगलं असेल, तर लोकांनी त्यांना निवडून दिलं आहे.”

“पंडित जवाहरलाल नेहरूंची कारकीर्द आपण बघितली. त्याच्यानंतर इंदिरा गांधींची कारकीर्द आपण बघितली. एक पोलादी स्त्री म्हणून त्या संपूर्ण जगात लोकप्रिय झालेल्या आपण बघितल्या. त्यानंतरच्या काळात आपण राजीव गांधींची कारकीर्द बघितली. मिस्टर क्लिन आणि संगणक युग आणण्याचं काम त्यांनी केलं”, असं अजित पवार म्हणाले.

हे वाचलं का?

केंद्रीय यंत्रणांच्या कारवाया वाढणार?; पंतप्रधान मोदींनी लालकिल्ल्यावरून कुणाला दिला इशारा?

ज्यांची कुवत नाही; मोदींच्या घराणेशाहींच्या मुद्द्यावर अजित पवार काय म्हणाले?

“हे जे घराणेशाही… घराणेशाही म्हटलं जातं, ज्यांच्यामध्ये कुवत नाही. ताकद नाही. वक्तृत्व नाही, नेतृत्व नाही अशानाच तुम्ही जर बळजबरीने त्या पदावर बसवलं, तर तुम्ही त्याला घराणेशाही म्हणून शकता. पण एखाद्याच्या घरात जन्माला आलेली पुढची पिढी जर कर्तृत्वावान असेल, लोकशाही पद्धतीने त्यांच्या भागातील मतदारांनी त्यांना आमदार किंवा खासदार केलं, तर त्याला घराणेशाही म्हणणं साफ चुकीचं आहे. हे माझं स्पष्ट मत आहे”, असं प्रत्युत्तर अजित पवार यांनी मोदींना दिलं.

ADVERTISEMENT

Narendra Modi Speech : २५ वर्षांसाठी ५ संकल्प! लालकिल्ल्यावरून मोदींनी देशाला काय सांगितलं?

ADVERTISEMENT

नरेंद्र मोदींच्या भ्रष्टाचारावरील टीकेला अजित पवारांनी काय दिलं उत्तर?

“मी त्यांचं (नरेंद्र मोदी) भाषण ऐकलं. भ्रष्टाचाराचं समर्थन कुणीच करणार नाही. जसे देशाचे पंतप्रधान करणार नाहीत, तसंच देशातील जनता, कोणत्याही राज्याचा मंत्री वा कुणीही करणार नाही. भ्रष्टाचारमुक्त भारत देश असलाच पाहिजे, त्याबद्दल दुमत असायचं कारणच नाही”, अशी भूमिका अजित पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर मांडली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT