पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात! असा आहे देहू, मुंबई दौरा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तीन कार्यक्रमांनिमित्त महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज देहू येथील संत तुकाराम महाराज शिळा मंदिरांचं लोकार्पण करण्यात येणार असून, त्यानंतर मुंबईत राज्यपालांच्या निवास्थानाच्या इमारतीचं उद्घाटन कार्यक्रम आहे. त्याचबरोबर मुंबई समाचारच्या कार्यक्रमालाही मोदी उपस्थित राहणार आहेत.

ADVERTISEMENT

आषाढी वारीसाठी सोमवारी (२० जून) जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. त्यापूर्वीच संत तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या लोकार्पणाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी मोदी देहूमध्ये येणार आहेत.

मोदींच्या दौऱ्याआधी पगडीचा वाद! ऐनवेळी तुकोबारायांच्या अभंगाच्या ओळीच बदलल्या, कारण…

हे वाचलं का?

लोकार्पण कार्यक्रमासाठी देहू येथील मंदिर परिसरात सभामंडप उभारण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी यांचं संत तुकाराम पगडीने स्वागत करण्यात येणार आहे. दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी मोदी यांचे लोहगाव विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर ते विमानतळावरून देहूच्या दिशेने रवाना होतील.

दुपारी एक वाजून ४५ मिनिटांनी ते मंदिर समिती जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मंदिर संस्था परिसरात दाखल होणार आहेत. या ठिकाणी संत तुकाराम महाराज मूर्ती शिळा मंदिराचा लोकार्पण कार्यक्रम होणार आहे.

ADVERTISEMENT

दुपारी दोन वाजून १० मिनिटांनी पंतप्रधान मोदी हे सभेच्या ठिकाणी दाखल होणार आहेत. त्यानंतर त्यांची ५० मिनिटांची सभा होणार असून, मोदी वारकरी आणि भाविकांशी संवाद साधणार आहेत.

ADVERTISEMENT

‘जल भूषण’ आणि ‘क्रांती गाथा’चं उद्घाटन

देहूतील कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतील कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. राजभवनमधील कार्यक्रमात मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एका व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधान मोदी हे देहू येथील कार्यक्रम पार पडल्यावर मुंबईत दाखल होणार आहेत. दुपारी त्यांच्या हस्ते राजभवनमध्ये ‘जल भूषण’ या नव्याने उभारण्यात आलेल्या राज्यपालांच्या निवासस्थानाची इमारत आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या क्रांती गाथा या दालनाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर मुंबई समाचार या गुजराती दैनिकाला २०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमालाही मोदी उपस्थित राहणार आहेत.

क्रांती गाथा! हेच ते भारावून टाकणारं संग्रहालय, ज्यांचं नरेंद्र मोदी करणार आहेत उद्घाटन

मुंबईतील वाहतुकीत बदल…

पंतप्रधान मोदी यांच्या मुंबईतील दौऱ्यामुळे मुंबई पोलिसांकडून वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. वांद्रे-कुर्ला संकुल कनेक्टर पुलाकडून आणि या परिसरातील सर्व प्रकारच्या वाहनांना एमसीए मैदान बंद गेट-३ समोरील ओएनजीसी इमारत चौकातून पुढे जिओ वर्ल्ड सेंटर, अमेरिकन दूतावास, ट्रायडंट हॉटेल, सॉफिटल हॉटेल आणि एमटीएनएल कुर्ल्याच्या दिशेने जाण्याकरिता प्रवेश बंद असणार आहे.

कुर्ला रझाक जंक्शन, एमटीएनएल जंक्शन, प्लॅटिना जंक्शन, ट्रायडंट हॉटेल, सॉफिटल हॉटेल व बीकेसी परिसरातील सर्व प्रकारच्या वाहनांना अमेरिकन दूतावास मार्गे जिओ वल्र्ड सेंटर व पुढे वांद्रे-कुर्ला संकुल कनेक्टरच्या दिशेने जाण्याकरिता अमेरिकन दूतावास, सिग्नेचर सनटेक पन्हाळा इमारत चौक येथे प्रवेशबंद असणार आहे.

एमसीए मैदान बंद गेट-३ समोरच्या ओएनजीसी इमारत येथून उजव्या बाजूला वळण घेऊन विदेश भवन, अंबानी स्कूल पार्किंग समोरून उजव्या बाजूला वळण घेऊन टाटा कम्युनिकेशन इमारतमार्गे एमटीएनएल जंक्शनवरून कुर्ल्याकडे जाता येणार आहे.

एमसीए मैदान बंद गेट-३ समोर ओएनजीसी इमारत चौकातून उजव्या बाजूला वळण घेऊन विदेश भवन अंबानी स्कुल पार्किंग अमेरिकन स्कूल येथून डावे वळण घेऊन ट्रायडंट व सॉफीटल हॉटेलकडे जाता येणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT