पंतप्रधान मोदींचं ठाकरे सरकारवर शरसंधान! मलिकांच्या बचावावरून साधला निशाणा?
गेल्या काही आठवड्यांपासून केंद्रीय संस्थांच्या कारवायांवरून राज्यातील राजकारण तापलं आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान कार्यालयालाच पत्र दिलेलं आहेत. तर दुसरीकडे नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर त्याच्या राजीनाम्याची मागणी होतं आहे. मात्र, त्यांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळून लावत, मलिकांना मुस्लीम असल्यानं टार्गेट केलं जातं असल्याचं पवार म्हणाले होते. त्यावरून पंतप्रधान मोदी यांनी […]
ADVERTISEMENT
गेल्या काही आठवड्यांपासून केंद्रीय संस्थांच्या कारवायांवरून राज्यातील राजकारण तापलं आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान कार्यालयालाच पत्र दिलेलं आहेत. तर दुसरीकडे नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर त्याच्या राजीनाम्याची मागणी होतं आहे. मात्र, त्यांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळून लावत, मलिकांना मुस्लीम असल्यानं टार्गेट केलं जातं असल्याचं पवार म्हणाले होते. त्यावरून पंतप्रधान मोदी यांनी नामोल्लेख टाळत निशाणा साधला आहे.
ADVERTISEMENT
पाच राज्यातील विजयानंतर संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी केंद्रीय संस्थाबद्दल होत असलेल्या चर्चेबद्दल भाष्य केलं. त्याचबरोबर भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई झाल्यानंतर धर्माशी जोडलं जात असून, अशा भ्रष्टाचाऱ्यांना धर्म, जातीपासून दूर करण्याचं आवाहन केलं.
काय म्हणाले मोदी?
हे वाचलं का?
“आजच्या प्रसंगी मी देशासमोर माझ्या काही चिंता मांडू इच्छितो. देशातील नागरिक मोठ्या जबाबदारीने देशहितासाठी काम करत आहे. राष्ट्रनिर्माणात लोक लागले आहेत. मात्र काही लोक वारंवार खालच्या स्तरावरील राजकारण करत आहेत. कोरोना काळात राजकारण केलं गेलं”, असं मोदी म्हणाले.
“मी कोणत्याही कुटुंबाविरोधात नाही. माझं कुणाशीही वैयक्तिक वैर नाही. मी लोकांना सांगितलं की, घराणेशाही राजकारणाने त्यांच्या राज्याचं नुकसान केलं. त्यांच्या राज्याला मागे नेलं. त्यामुळेच लोकांनी भाजपला मत दिलं आणि लोकशाहीची ताकद मजबूत केली. भारतात एकदिवस येईल, जेव्हा घराणेशाहीच्या राजकारणाचा सूर्यास्त देशातील नागरिक करतील”, असं मोदी यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
“आज मी देशासमोर मांडू इच्छिणारा हा विषय आहे भ्रष्टाचाराविरोधातील कारवाईचा. भ्रष्टाचाराविरोधात कारवाई व्हायला हवी की नको? भ्रष्टाचार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई व्हायला हवी की नको? भ्रष्टाचाराची वाळवी नष्ट व्हायला हवी की नको? आपल्या देशात भ्रष्टाचार आणि भ्रष्टचार करणाऱ्या लोकांविरोधात जनतेत तीव्र तिरस्काराची भावना आहे,” असं मोदी म्हणाले.
ADVERTISEMENT
“देशाची संपत्ती लुटून स्वतःच्या तिजोऱ्या भरण्याची प्रवृत्ती काही लोकांच्या नावासोबत जोडली गेली आहे. २०१४ मध्ये भाजप प्रामाणिक सरकारचं वचन देऊन सत्तेत आलं. २०१९ मध्ये जनतेनं पुन्हा आशीर्वाद दिला आणि देशाला आमच्याकडून अपेक्षा आहे. तुमचंच सरकार आहे जे भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करू शकते. जनतेची ही अपेक्षा पूर्ण करायला हवी की नको? पण आज आपण बघतोय की, निष्पक्ष संस्था आहेत. ज्या पूर्णपणे स्वायत्त आहेत. त्या जेव्हा कारवाई करतात, हे लोक आणि त्यांचं पूर्ण वर्तुळ भ्रष्टाचाऱ्यांचं संरक्षण करण्यासाठी संस्थांना बदनाम करण्यासाठी समोर येत आहेत.”
“हे देशाचे केवढं मोठं दुर्दैव आहे. घोटाळ्यांनी घेरले गेलेले हे लोक एकत्र येऊन त्यांच्या वर्तुळाचा वापर करून या संस्थांवर दबाब निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. तपास यंत्रणांना रोखण्यासाठी नवनव्या कल्पना शोधत आहेत. या लोकांना देशाच्या न्यायपालिकेवरही विश्वास नाही. आधी हजारो कोटींचा घोटाळा करायचा आणि नंतर तपास करू नका म्हणायचं आणि तपास केला की त्याविरोधात दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा, ही या लोकांची प्रवृत्ती आहे,” असं म्हणत मोदींनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवर टीका करणाऱ्यांवर निशाणा साधला.
“देशातील लोकांचं आणखी एका गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छितो की, हे लोक कोणत्याही भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई होताच त्याला धर्माचा रंग देतात. प्रदेशाचा रंग देतात. जातीचा रंग देतात. हे नवीन प्रवृत्ती समोर आल्या आहेत. कोणत्या माफियाविरोधात न्यायालयाने निर्णय दिला, तर त्यावरही लोक त्याला धर्म आणि जातीशी जोडतात. त्यामुळे मी सर्व धर्मियांना आवाहन करतो की, प्रामाणिक लोकांना आग्रह करतो. त्या सगळ्यांनी विचार करावा. अशा भ्रष्टाचाऱ्यांना, माफियांना धर्म, जाती, संप्रदायातून दूर कऱण्याची हिंमत दाखवावी. त्यामुळे समाज मजबूत होईल आणि प्रत्येक व्यक्तीचं कल्याण होईल,” असं आवाहन मोदींनी केलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT