Poker, MMA टेलिशॉपिंग, राज कुंद्राच्या व्यवसाय साम्राज्याचे वादग्रस्त भाग
शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. फक्त राज कुंद्राच नाही तर या प्रकरणात त्याच्यासह एकूण 11 जणांना अटक करण्यात आली आहे. राज कुंद्राचं हॉटशॉट अॅप कनेक्शन काय होतं ते देखील पोलिसांनी सांगितलं आहे. मात्र ही पहिली वेळ नाही की राज कुंद्रा कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. त्याने आपल्या व्यवसायाचं साम्राज्य तयार […]
ADVERTISEMENT

शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. फक्त राज कुंद्राच नाही तर या प्रकरणात त्याच्यासह एकूण 11 जणांना अटक करण्यात आली आहे. राज कुंद्राचं हॉटशॉट अॅप कनेक्शन काय होतं ते देखील पोलिसांनी सांगितलं आहे. मात्र ही पहिली वेळ नाही की राज कुंद्रा कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. त्याने आपल्या व्यवसायाचं साम्राज्य तयार केलं. मात्र त्याच्या साम्राज्यात असे अनेक वादग्रस्त भाग येऊन गेले आहेत.
IPL या प्रसिद्ध क्रिकेट स्पर्धेतील राजस्थान रॉयल्स या संघाची मालकी राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीकडे होती. मात्र यामध्येही स्पॉट फिक्सिंगचे आरोप राज कुंद्रावर झाले. 2013 मध्ये ते प्रकरण उघडकीस आलं होतं. राज कुंद्राचा त्यावेळी झालेल्या स्पॉट फिक्सिंगमध्ये मध्यवर्ती सहभाग होता. त्यामुळे राज कुंद्रावर त्यावेळी बंदी घालण्यात आली. ज्यानुसार तो कोणत्याही आयपीएल टीमशी संबंधित राहू शकत नाही. आता त्याच्या पॉर्नोग्राफिक्स फिल्म निर्मितीची सगळी कहाणी समोर आली आहे. या प्रकरणातही मुख्यत्वे करून राज कुंद्राचाच प्रमुख सहभाग आहे. इतर सगळे लोक म्हणजे त्या साखळीचा एक भाग आहेत.
HotShot या App वर अश्लील व्हीडिओज आणि सेक्स कंटेट इतका वाढला होता की ते App आधी Appale Play Store आणि नंतर अँड्रॉईडने रिमूव्ह केलं. HD videos and Short movies असं या अॅपचं डिस्क्रिप्शन देण्यात आलं होतं. या अॅपवर जगभरातल्या मॉडेल्ससोबत लाईव्ह कम्युनिकेशनही करता येत होतं. या ठिकाणी तयार होणाऱ्या शॉर्ट फिल्म आणि वेब सीरिजमध्ये काम देतो असं आमिष पुरूष आणि स्त्री कलाकारांना दिलं जात होतं आणि त्यांच्याकडून न्यूड किंवा सेमी न्यूड सीन शूट करून घेतले जात होते. हेच सीन या App मध्ये प्रसारितही केले जात होते. मुंबई पोलिसांनी या संदर्भातली माहिती दिली.