वारकरी नेते बंडातात्या कराडकर पोलिसांच्या ताब्यात, पायी वारीचा संघर्ष पेटण्याची शक्यता
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या आषाढी एकादशीसाठी राज्य सरकारने पायी वारीवर निर्बंध घातले आहेत. परंतू पायी वारीसाठी आग्रही असणारे वारकरी नेते बंडातात्या कराडकर यांना पोलिसांना ताब्यात घेतलं आहे. पिंपरी-चिंचवड येथील दिघी पोलिसांनी आज पहाटे बंडातात्यांना ताब्यात घेत वडमुखवाडी चरहोली येथे त्यांना स्थानबद्ध केलं आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने यंदाही पायी वारीला परवानगी नाकारली आहे. मात्र पायी […]
ADVERTISEMENT

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या आषाढी एकादशीसाठी राज्य सरकारने पायी वारीवर निर्बंध घातले आहेत. परंतू पायी वारीसाठी आग्रही असणारे वारकरी नेते बंडातात्या कराडकर यांना पोलिसांना ताब्यात घेतलं आहे. पिंपरी-चिंचवड येथील दिघी पोलिसांनी आज पहाटे बंडातात्यांना ताब्यात घेत वडमुखवाडी चरहोली येथे त्यांना स्थानबद्ध केलं आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने यंदाही पायी वारीला परवानगी नाकारली आहे. मात्र पायी वारीवर ठाम असणाऱ्या बंडातात्या कराडकरांनी शनिवारी पहाटे आपल्या सहकाऱ्यांसह पायी वारीला सुरुवात केली. यावेळी पोलिसांनी कराडकरांना पायी वारी करु नये असं सांगितलं तरीही आपल्या मागणीवर ठाम राहिल्यामुळे अखेरीस कराडकरांना पोलिसांनी स्थानबद्ध केलं आहे.
आळंदी येथे पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. ज्यात काही वारकऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे वारकऱ्यांनी आळंदी, देहू येथे गर्दी करु नये, निर्बंधांचं पालन करावं असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. आळंदी आणि देहू येथे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
असा असेल यंदाचा पालखी सोहळा –