स्मृती इराणींविरोधात आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादीच्या ५० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पुण्यात आल्यानंतर त्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० ते ५० कार्यकर्त्यांनी विरोधात पुण्यातील चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्मृती इराणी पुण्यातील जे डब्ल्यू मॅरियट मध्ये एका कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. तसेच जे डब्ल्यू मॅरियट हॉटेल मध्ये […]
ADVERTISEMENT

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पुण्यात आल्यानंतर त्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० ते ५० कार्यकर्त्यांनी विरोधात पुण्यातील चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्मृती इराणी पुण्यातील जे डब्ल्यू मॅरियट मध्ये एका कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. तसेच जे डब्ल्यू मॅरियट हॉटेल मध्ये शिरण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
काय घडली घटना?
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते अमित शाह (Amit Shah) यांच्या पुस्तकाचं प्रकाशन पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात पार पडलं. पुण्यातल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस विरूद्ध भाजप असा मोठा राडा झाला होता. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीमुळे भाजपचा कार्यक्रम काहीवेळ थांबवावा लागला होता.