प्रविण दरेकर यांच्याविरोधात पुण्यातील सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
पुणे: ‘राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे.’ असं वादग्रस्त वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केलं होतं. त्यांचं हेच वक्तव्य आता त्यांना अडचणीचं ठरु शकतं. कारण याप्रकरणी पुण्याच्या सिंहगड पोलीस ठाण्यात दरेकरांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी स्वत: प्रविण दरेकरांनी केलेल्या वक्तव्याविरोधात पुण्याच्या […]
ADVERTISEMENT

पुणे: ‘राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे.’ असं वादग्रस्त वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केलं होतं. त्यांचं हेच वक्तव्य आता त्यांना अडचणीचं ठरु शकतं. कारण याप्रकरणी पुण्याच्या सिंहगड पोलीस ठाण्यात दरेकरांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी स्वत: प्रविण दरेकरांनी केलेल्या वक्तव्याविरोधात पुण्याच्या सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. प्रविण दरेकर यांनी महिलांचा अपमान करणारं वक्तव्य केल्याचा आरोप यावेळी चाकणकर यांनी केला आहे. याबाबतची माहिती स्वत: चाकणकर यांनी आपल्या ट्विटरवरुन दिली आहे.
पाहा यावेळी रुपाली चाकणकर नेमकं काय म्हणाल्या:
‘गेल्या दोन वर्षांपासून म्हणजे कोरोनाच्या कालावधीपासून भाजप हा सातत्याने महाराष्ट्राच्या एकतेला आणि उज्ज्वल परंपरेला नख लावायचं काम करतोय. सातत्याने महाराष्ट्राची बदनामी कशी करता येईल याकडे त्यांचं जास्त लक्ष असतं. यामध्ये वैयक्तिक स्वार्थासाठी अतिशय खालच्या राजकारणाची पातळी भाजपने गाठलेली आहे.’