उल्हासनगर: पोलीस अधिकाऱ्याने ‘यासाठी’ स्वीकारली 20 हजाराची लाच, अन्…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

उल्हासनगर: उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका कंपनीमध्ये अपघात होऊन एका कामगाराचा मृत्यू झाला होता. कंपनीने हलगर्जी पणा केल्याचा ठपका कंपनीवर ठेवला. याच प्रकरणात हिललाईन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षण धनंजय गंणगे यांनी 25 हजार रुपयांची मागणी केली होती. गुरुवारी दुपारी तक्रारदार महिलेने 20 हजार रुपयात तडजोड करून पैसे गणगे यांच्या स्वाधीन केले. दरम्यान, त्याचवेळी पैसे जवळ असतानाच ठाणे अँटी करप्शन ब्युरोने नेवाळी चौकीत प्रवेश करत गणगे यांना ताब्यात घेतले आहे.

ADVERTISEMENT

उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या नेवाळी चौकीत पहिल्यांदाच लाचलुचपत विभागाची कारवाई झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उसाटणे येथील एका कंपनीत काही महिन्यांपूर्वी एक अपघात झाला होता.

या अपघातात कामगाराला आपले जीव गमवावे लागले होते. यानंतर या कंपनीवर पोलीस प्रशासनाने हलगर्जीपणाचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती. यानंतर या कंपनी व्यवस्थापनाने गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलिसांना आर्थिक रसद देण्याचे आश्वासन दिले होते.

हे वाचलं का?

पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय गणगे यांना गुरुवारी एका महिलेने वीस हजार रुपयांची लाच दिली. मात्र, ही लाच स्वीकारत असताना तातडीने ठाणे अँटी करप्शन ब्युरो यांच्या पथकाने नेवाळी चौकीत धाड टाकत धनंजय घाडगे यांना ताब्यात घेतलं आहे.

सध्या त्यांची रवानगी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात करण्यात आली असून ठाणे अँटी करप्शन ब्युरोचे पथक या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT