पतीला खांद्यावर उचलून घेणाऱ्या बायकोचं पोस्ट विभागाकडून कौतुक
महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वीच ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा उडाला. निकालादरम्यान पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पाळू गावातल्या संतोष गुरव यांनी बाजी मारली. यानंतर संतोष यांच्या पत्नी रेणुका यांनी सेलिब्रेशनदरम्यान आपल्या पतीला खांद्यावर उचलून घेत त्यांची मिरवणूक काढली. प्रसारमाध्यमांमध्ये हा फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर राजकीय नेत्यांपासून सेलिब्रेटींनीही रेणुका यांचं कौतुक केलं. ग्रामीण भागातल्या या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनची आता केंद्र सरकारच्या पोस्ट […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वीच ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा उडाला. निकालादरम्यान पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पाळू गावातल्या संतोष गुरव यांनी बाजी मारली. यानंतर संतोष यांच्या पत्नी रेणुका यांनी सेलिब्रेशनदरम्यान आपल्या पतीला खांद्यावर उचलून घेत त्यांची मिरवणूक काढली. प्रसारमाध्यमांमध्ये हा फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर राजकीय नेत्यांपासून सेलिब्रेटींनीही रेणुका यांचं कौतुक केलं.
ADVERTISEMENT
ग्रामीण भागातल्या या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनची आता केंद्र सरकारच्या पोस्ट विभागाने दखल घेतली आहे. रेणुका गुरव यांना पोस्टाचं तिकीट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे. एका छोटेखानी सोहळ्यामध्ये रेणुका गुरव यांचा टपाल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सत्कार केला.
खेड तालुक्यातील आदिवासी भागातील पाळू ग्रामपंचायतीमध्ये महाविकास आघाडीच्या जाखमाता ग्रामविकास परिवर्तन पॅनलचा दारूण पराभव करत भाजपाच्या जाखमातादेवी ग्रामविकास पॅनलने 7 पैकी 6 जागावर वर्चस्व मिळवले. या घवघवीत यशा मागे महिलांचा मोठा मोलाचा वाटा होता. त्यामुळे विजयाचा जल्लोष करत असताना गावातील विजयी उमेदवार संतोष गुरव ला त्यांच्याब पत्नी रेणुका यांनी उचललेले होते.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT