मुंबई, ठाण्यासह कल्याण-डोंबिवलीत ब्लॅक आऊट! वीज पुरवठा ५५ मिनिटांसाठी खंडीत
महापारेषण कंपनीच्या पडघा येथील ४४० किलोवॅट उच्चदाब वीज वाहिनीत मंगळवारी सकाळी १० च्या दरम्यान अचानक बिघाड झाला. त्यामुळे बदलापूर, कल्याण, डोंबिवली, डोंबिवली एमआयडीसी, पलावा सिटी, मुंबई, ठाणे या सगळ्या ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला. महाराष्ट्रात मंगळवारी सकाळी मुंबई आणि ठाण्यातील विविध भागात वीजपुरवठा खंडित झाला. सूत्रांनी सांगितले की, कळवा पडघा 400 केव्ही ट्रान्समिशन लाइन ट्रिप […]
ADVERTISEMENT
महापारेषण कंपनीच्या पडघा येथील ४४० किलोवॅट उच्चदाब वीज वाहिनीत मंगळवारी सकाळी १० च्या दरम्यान अचानक बिघाड झाला. त्यामुळे बदलापूर, कल्याण, डोंबिवली, डोंबिवली एमआयडीसी, पलावा सिटी, मुंबई, ठाणे या सगळ्या ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात मंगळवारी सकाळी मुंबई आणि ठाण्यातील विविध भागात वीजपुरवठा खंडित झाला. सूत्रांनी सांगितले की, कळवा पडघा 400 केव्ही ट्रान्समिशन लाइन ट्रिप झाल्याने मुंबई आणि ठाण्यातील काही भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला.
हे वाचलं का?
मुंबईतील दादर, माहीम, वांद्रे, खार, वाकोला, सांताक्रूझ आदी भागात वीजपुरवठा खंडित झाला. डोंबिवली आणि कल्याणसारख्या ठाणे भागात सकाळी १० वाजल्यापासून वीजपुरवठा खंडित झाला. आधीच उकाडा आणि तापमान प्रचंड वाढलेलं आहे. अशात वीज गेल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. उच्चदाब वीज वाहिनीतील बिघाडाच्या दुरूस्तीचं काम महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी तातडीने हाती घेतलं. वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचीही माहिती देण्यात आली.
आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास स्काऊट गाईड राज्य पुरस्कार आणि प्रमाणपत्र वितरण सोहळा पार पडणार होता. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते कारण त्यांच्याच हस्ते पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार होतं. मात्र बत्ती गुलचा फटका या कार्यक्रमात यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार आहेत. त्याशिवाय, खनिजकर्म, क्रीडा आणि युवक कल्याण, माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या राज्यमंत्री अदिती तटकरे उपस्थित राहणार होते. हा कार्यक्रम सुरू होण्याआधीच वीज पुरवठा खंडीत झाला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT