‘छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला’, प्रसाद लाडांच्या विधानाने वादाला खतपाणी!
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदींनी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानांमुळे निर्माण झालेलं वादंग अद्यापही संपलेलं नाही. त्यातच आता भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाबद्दल चुकीचं विधान केलं आहे. लाड यांच्या या विधानामुळे संपूर्ण वादाला खतपाणी मिळाल्याचंच दिसत असून विरोधकांनी यावरून भाजपची कोंडी केली आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती […]
ADVERTISEMENT

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदींनी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानांमुळे निर्माण झालेलं वादंग अद्यापही संपलेलं नाही. त्यातच आता भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाबद्दल चुकीचं विधान केलं आहे. लाड यांच्या या विधानामुळे संपूर्ण वादाला खतपाणी मिळाल्याचंच दिसत असून विरोधकांनी यावरून भाजपची कोंडी केली आहे.
भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जुन्या काळातले आदर्श म्हटले, तर भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी सावरकरांनी ब्रिटिशांकडे केलेल्या अर्जांवर भूमिका मांडतांना छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला लिहिलेल्या पत्रांचा उल्लेख करत त्याला माफीनामा म्हणणार का? असं विधान केलं होतं.
या दोन्ही विधानावरून महाराष्ट्रात राजकारण तापलं आहे. विरोधकच नव्हे, तर भाजप खासदार उदयनराजे भोसले आणि भाजपकडून राज्यसभा खासदार राहिलेले छत्रपती संभाजीराजे भोसले हेही आक्रमक झालेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हटवण्याची मागणी महाराष्ट्रात जोर धरत असतानाच आता भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केलेल्या विधानामुळे हे प्रकरण चिघळण्याची शक्यता निर्माण झालीये.
‘कोण तो राज्यपाल.. तो कधी मोठा नव्हताच…’, उदयनराजेंना संताप अनावर