Crime: अमरावती कारागृहात कैद्यांचा राडा; तर नागपुरात अधिकाऱ्याला मारहाण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Clash between two groups at Amravati Central Jail: अमरावती: अमरावतीच्या (Amravati) मध्यवर्ती कारागृहात (Central Jail) 21 जानेवारी रोजी सायंकाळी पुण्यातील येरवडा कारागृहातून आलेल्या कैद्यांनी (prisoners) कारागृहाच्या आतच दोन कैद्यांशी वाद घालत त्यांना थेट मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी अमरावतीच्या फेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये मारहाण करणाऱ्या आठ कैद्यांविरुद्ध कारागृह प्रशासनाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या मारहाणीत जखमी झालेल्या दोन कायद्यांवर प्राथमिक उपचार कारागृहातील रुग्णालयात सुरू आहे. (prisoners pother at amravati central jail a clash between two groups)

ADVERTISEMENT

फेजरपुरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 21 तारखेला सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कारागृहाच्या आत मध्येच दोन कैद्यांमध्ये काही कारणांवरुन वादावादी सुरू झाली. हा वाद सुरू असतानाच आरोपीने दुसऱ्या आरोपीला शिवीगाळ करत थेट लाथा-बुक्क्यांनी मारहाण सुरू केली.

Pune Crime : बंदुकीचा धाक अन् महिलेला खाऊ घातली स्मशानातील हाडांची पावडर

हे वाचलं का?

दरम्यान, या घटनेची माहिती तेथील पोलीस कर्मचाऱ्यांना मिळताच त्यांनी बरॅकच्या दिशेने धाव घेत हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. पण कैदी फारच आक्रमक झालेले असल्याने ते पोलीस कर्मचाऱ्यांचेही ऐकत नव्हते. त्यामुळे आणखी इतर कर्मचाऱ्यांना बोलावून आणि सौम्य बाळाचा वापर करत जेल प्रशासनाने तात्काळ हा वाद थांबवला.

या प्रकरणात कारागृह प्रशासनाने या प्रकरणाची तक्रार फेजरपुरा पोलीस स्टेशनला केली असून पोलिसांनी आठही आरोपींविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले असून याप्रकरणी आता पोलीस आणि जेल प्रशासन अधिक तपास करत आहेत.

ADVERTISEMENT

Kalyan Crime : वय २२ अन् दाखल गुन्हे ८०! पोलिसांसाठी बनला मोस्ट वॉन्टेड आरोपी

ADVERTISEMENT

नागपूरमध्ये कैद्याकडून चक्क तुरुंग अधिकाऱ्याला मारहाण

दुसरीकडे नागपूरच्या (Nagpur) मध्यवर्ती कारागृहात देखील अशीच खळबळजनक घटना घडली आहे. कारागृहातील फाशीयार्ड मधील कैद्याने थेट तुरुंग अधिकाऱ्यालाच मारहाण केल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे.

कैद्याने सामान्य कपडे घातले असल्याचे पाहताच तुरुंग अधिकाऱ्याने संबंधित कैद्याला तुरुंगात दिले जाणारे कपडे घालण्यास सांगितलं. पण यामुळे कैदी प्रचंड चिडला आणि त्याने सरळ अधिकाऱ्यालाच मारहाण करण्यास सुरुवात केली.

साहिल अजमल काळसेकर असे कैद्यांचे नाव असून त्याला रत्नागिरी कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तो सध्या नागपूर जेलमध्ये शिक्षा भोगत असून त्याला फाशी यार्डमध्ये ठेवण्यात आलं आहे.

दरम्यान, या मारहाण प्रकरणी नागपूरच्या धंतोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT