पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील प्रियदर्शनी वाघिणीचा मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुण्यातील कात्रज येथील राजीव गांधी राष्ट्रीय प्राणी संग्रहालयातील होती. प्रियदर्शनी वाघिणीचा वयाच्या 21 व्या वर्षी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राजीव गांधी प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ.राजकुमार जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राणी संग्रहालयामधील प्रियदर्शनी वाघिण मागील दोन चार दिवसापासून काही खात नव्हती. त्यात तिचं वय 21 होते,साधारण वाघ किंवा वाघिणीचे वय 16 ते 18 पर्यंत असते.

ADVERTISEMENT

वाढत्या वयामुळे तिने खाणे सोडले असावे.त्यात तिचा आज सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले आणि नंतर रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास राजीव गांधी प्राणी संग्रहालयात अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, राजीव गांधी प्राणी संग्रहालयात आता एकूण 4 वाघ आणि 3 वाघिणी आहेत. त्यापैकी प्राणीसंग्रहालयात नुकतीच अर्जुन आणि भक्तीची जोडी औरंगाबादहून दाखल झाली आहे. त्याचबरोबर रिद्धी, गुरु, आकाश आणि तानाजी असे सहा पिवळे पट्टेरी वाघ आहेत. तर, राजकोटवरून आणलेल्या पांढऱ्या पट्टेरी वाघिणीचे नाव अजून ठेवण्यात आलेले नाही.

हे वाचलं का?

वाघांचे सर्वसाधरण वय 16 ते 18 वर्ष असते. आम्हाला आणखी एक ते दोन महिने प्रियदर्शनी जगेल अशी आशा होती. परंतु, आज तिने अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे प्राणीसंग्रहालयातील वाघांची संख्या आता आठवरून सात झाली आहे असंही सांगण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT