Video: पुण्यात सोनसाखळी चोरणाऱ्या चोराशी 10 वर्षांची मुलगी एकटीच भिडली
Chain Snatcher Viral Video : राज्यात चोरीच्या दररोज अनेक घटना घडत असतात. या चोरीच्या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेत एका आजीच्या गळ्यातून एका दुचाकीस्वाराने सोनसाखळी (Chain Snatcher) चोरी केल्याचा प्रयत्न केला होता. यावेळी चोरीचा हा डाव हाणून पाडण्यासाठी आजीसोबत असलेली 10 वर्षाची नात चोरासोबत […]
ADVERTISEMENT
Chain Snatcher Viral Video : राज्यात चोरीच्या दररोज अनेक घटना घडत असतात. या चोरीच्या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेत एका आजीच्या गळ्यातून एका दुचाकीस्वाराने सोनसाखळी (Chain Snatcher) चोरी केल्याचा प्रयत्न केला होता. यावेळी चोरीचा हा डाव हाणून पाडण्यासाठी आजीसोबत असलेली 10 वर्षाची नात चोरासोबत एकटीच भिडली होती. या घटनेचा हा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असून त्या मुलीचे कौतूक होत आहे. (Attempt to steal gold chain from grandmother’s neck 10-year-old granddaughter confronts thief alone video viral)
ADVERTISEMENT
तब्बल 13 महिलांवर बलात्कार करणारा वासनांध तुरुंगातून सुटला!
घटनाक्रम काय?
पुण्याच्या शिवाजीनगर मॉर्ड़न कॉलनीत 60 वर्षीय लता घाग आपल्या दोन्ही नातींसह घरी जात होत्या. यावेळी रस्त्याने जात असताना एक हेल्मेट घातलेला दुचाकीस्वार त्यांच्याजवळ आला आणि त्यांना पत्ता विचारू लागला. आजी नेमकं चोराला कोणता पत्ता हवा आहे, हे ऐकण्यासाठी त्याच्याजवळ गेल्या. यावेळी चोराने डाव साधत आजीच्या गळ्यातली सोन्याची साखळी (Chain Snatcher) ओढली. आजीने चोराला विरोध करण्याचा प्रयत्न केला मात्र त्या अपयशी ठरल्या. मात्र आजीसोबत असलेली 10 वर्षीय रूत्वी घाग चोरासोबत एकटीच भिडली होती. तिने चोराला विरोध करण्याचा प्रयत्न केला. बुधवारी रात्री 8 वाजता ही घटना घडली.
हे वाचलं का?
डोक्यात घातला हातोडा, पत्नीने जागेवरच जीव सोडला; नागपूरमध्ये खळबळ
चोराशी केले दोन हात
आजीच्या गळ्यातली सोनसाखळी (Chain Snatcher) चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोराला रूत्वी घागने विरोध करण्याचा प्रयत्न केला. रूत्वी हातातल्या एका थैलीने चोराच्या डोक्यावर जोरदार प्रहार करत होती.साधारण दोन-तीन वेळा तीने चोराच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात ती यशस्वी देखील झाली, मात्र चोराने हेल्मेट घातल्याने त्याला दुखापत झाली नाही. मात्र मुलीच्या या विरोधाने चोराला डाव फसण्याची भीती होती.
ADVERTISEMENT
Viral: जेव्हा 50 वर्षांचा शिक्षक 20 वर्षीय विद्यार्थिनीच्या पडतो प्रेमात
ADVERTISEMENT
चोराने पळ काढला
चिमुकलीने विरोध केल्याने चोराला डाव फसण्याची भीती होती, त्यामुळे चोराने गाडीची स्पीड वाढवून तिथून पळ काढला होता. त्यामुळे मुलीचा चोरीचा डाव उधळण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. या घटनेत आजीनेही त्याला गाडीवरून पाडण्याचा प्रयत्न केला.मात्र त्याने गाडी वेगाने पळवल्याने आजी रस्त्यावर कोसळल्या होत्या. त्यामुळे त्या जखमी झाल्या आहेत.
10 वर्षांची नात चोरालाच भिडली… pic.twitter.com/hqytaD9OdU
— prashant gomane (@GomanePrashant) March 9, 2023
दरम्यान या घटनेचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण 10 वर्षाच्या मुलीचे कौतूक करत आहेत. या प्रकरणात दुचाकीस्वार सोनसाखळी चोरण्यात यशस्वी ठरला आहे. हा व्हिडिओ पाहून पोलिसांनी चोराचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणाचा कसून तपास सूरू आहे.
Viral Video : बुलेटच्या पेट्रोल टाकीवर मुलगी, मागे ड्रायव्हर… रोमान्सचा व्हिडिओ व्हायरल
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT