Pune : जेव्हा महापौर मोहोळ, खासदार बापट थेट राष्ट्रवादीच्या कार्यालयात पोहचतात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राजकारण म्हटलं की पक्षांतर्गत हेवेदावे, आरोप-प्रत्यारोप या गोष्टी आल्याच. परंतू महाराष्ट्रातले राजकारणी मंडळी या पलीकडे जाऊन अनेकदा एकमेकांचं कौतुक करताना दिसतात, यावेळी पक्षाची बंधन त्यांच्यामध्ये येत नाही. सध्या राज्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस हा सामना रंगत असला तरीही पुण्यात एक वेगळच चित्र पहायला मिळालं. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट आणि अन्य नेत्यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन कार्यालयाला भेट दिली.

महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट, पुणे शहराध्यक्ष आमदार जगदीश मुळीक, ओबीसी प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर व अन्य नेते मंडळी थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात दाखल झाली. नव्या कार्यालयातून राष्ट्रवादीचं काम कसं चालतं याची माहिती यावेळी घेण्यात आली. अचानक कार्यालयात आलेल्या भाजप नेत्यांचं राष्ट्रवादी नेते अंकुश काकडे आणि आमदार प्रशांत जगताप यांनी स्वागत केलं.

राजकीय भेदाभेद विसरून प्रेम सलोखा जपणे हीच पुण्याची संस्कृती आहे. याच भावनेने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन कार्यालयाला भेट दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवीन कार्यालय छत्रपती शाहु सेतुजवळ (डेंगळे पूल) येथे सुरु करण्यात आले आहे. यानिमित्ताने चहापानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपस्थित राहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या, असं भाजप शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांनी सांगितलं. तसंच राष्ट्रवादीने पुणे शहराच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी पुणे शहर भाजपला सहकार्य करावे, ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT