पुण्यात राडा : अतिक्रमण काढण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना नागरिकांकडून मारहाण
पुणे महापालिकेची मुदत संपल्यानंतर आता महापालिकेची सत्ता प्रशासकाकडे आली आहे. त्यामुळे प्रशासनाने पुण्यातील अतिक्रमणांवर पुन्हा एकदा जेसीबी चालवण्यास सुरूवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कारवाई सुरू असून, आज धानोरी भागात अतिक्रमण काढण्यासाठी आलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. पुण्यातील धानोरी भागात कारवाईसाठी गेलेल्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना मारहाण झाल्याची घटना आज घडली आहे. […]
ADVERTISEMENT

पुणे महापालिकेची मुदत संपल्यानंतर आता महापालिकेची सत्ता प्रशासकाकडे आली आहे. त्यामुळे प्रशासनाने पुण्यातील अतिक्रमणांवर पुन्हा एकदा जेसीबी चालवण्यास सुरूवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कारवाई सुरू असून, आज धानोरी भागात अतिक्रमण काढण्यासाठी आलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली.
पुण्यातील धानोरी भागात कारवाईसाठी गेलेल्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना मारहाण झाल्याची घटना आज घडली आहे. कारवाईसाठी गेलेल्या पथकावर स्थानिकांनी हल्ला करत पालिकेच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या सर्व प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात येत आहे.